रविवार, सप्टेंबर 6, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

देशमुखांच्या सूनेचे संस्कार, जिनिलीया देशमुखने परंपरा जपत घरच्या घरीच साजरी केली वटपौर्णिमा, म्हणाली, “नवरा…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 10, 2025 | 5:15 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
genelia deshmukh Vat purnima

देशमुखांच्या सूनेचे संस्कार, जिनिलीया देशमुखने परंपरा जपत घरच्या घरीच साजरी केली वटपौर्णिमा, म्हणाली, "नवरा..."

genelia deshmukh Vat purnima : आज सर्वत्र वटपौर्णिमा अगदी थाटामाटात साजरी केली जाताना दिसत आहे. अनेक कलाकार मंडळीही त्यांची पहिली वटपौर्णिमा साजरी करताना दिसत आहेत. रेश्मा शिंदे, अंकिता वालावलकर या कलाकारांनी त्यांची वटपौर्णिमा साजरी केली. तर बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री जेनेलिया देशमुखनेही वटपौर्णिमा साजरी केली असल्याचं समोर आलं आहे. देशमुखांच्या सूनेने महाराष्ट्रीयन परंपरा जपत वटपौर्णिमा साजरी केली आहे. देशमुखांच्या घरी प्रत्येक सणवार अगदी मराठमोळ्या अंदाजात साजरे केले जातात. रितेशबरोबर लग्न करुन देशमुखांच्या घरी आल्यानंतर जेनेलिया नेहमीच प्रत्येक परंपरा जपण्यात पुढाकार घेताना दिसली.

अगदी आपुलकीने जेनेलिया तिच्या सासरी प्रत्येक सण तितक्याच उत्सवात साजरा करते. आणि याचे अनेक फोटो, व्हिडीओ देखील ती सोशल मीडियावर शेअर करते. यामुळे नेहमीच सोशल मीडियावर तिचं कौतुक झालेलं पाहायला मिळालं आहे. सोशल मीडियावर तर जेनेलियाला सगळेच वहिनी अशी आत्मीयतेने हाक देतात. तर रितेशला दादा म्हणतात. प्रेक्षकांच्या या लाडक्या जेनेलिया वहिनीने वटपौर्णिमा साजरी केली असून तिने याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

आणखी वाचा – “तोच पती सात जन्म मिळतो हे पटतं तुला?”, वटपौर्णिमा साजरी करण्यावरुन अंकितावर भडकली चाहती, दिलं सडेतोड उत्तर

View this post on Instagram

A post shared by Itsmajja Marathi (@itsmajja.marathi)

दरवर्षीप्रमाणे यंदाही जेनेलियाने वटपौर्णिमा साजरी केली असून याचा सुंदर असा व्हिडीओ इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. “dearest नवरा, आय लव्ह्यू यु रितेश”, असं कॅप्शन देत तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे. आणि यामध्ये रितेशलाही टॅग केलं आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये जेनेलियाने घरच्या घरीच वटपौर्णिमेची तयारी केली असल्याचं दिसत आहे. आणि ती वडाला सात फेरे घेताना दिसत आहे.

आणखी वाचा – पारंपरिक लूक, मराठमोळा साज अन्…; रेश्मा शिंदेची पहिली वटपौर्णिमा, साऊथ इंडियन पतीसह घेतले सात फेरे

यावेळी अभिनेत्रीचा मराठमोळा अन्दाज पाहायला मिळत आहे. अभिनेत्रींच्या या संस्काराचे अनेकजण कौतुक करत आहेत. यापूर्वीही देशमुखांच्या सूनेच्या संस्काराचे कौतुक झालेले पाहायला मिळाले. रितेश आणि जेनेलिया यांच्या मुलांवरील संस्कारांचेही वेळोवेळी कौतुक झाले आहे. कलाविश्वात ही जोडी लोकप्रिय जोडींपैकी एक असून नेहमीच ते चर्चेत असतात. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अखेर जेनेलिया आणि रितेश यांनी २०१२ मध्ये लग्न केले.

Tags: entertainmentgenelia deshmukhriteish deshmukh
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Next Post
Paaru fame sharayu sonawane

Video : नवरा, घरापासून दूर असलेल्या पारूने सेटवरच साजरी केली वटपौर्णिमा, शूटिंगच्या व्यस्त श्येड्युलमधूनही वेळ काढत जपली परंपरा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.