कुठल्याही चित्रपट, मालिका, वेब सिरीज या सर्वांमध्ये महत्वाची बाजू असते ती गाण्याची याशिवाय केवळ गाण्यांची अशी हि एक वेगळी जादू पाहायला मिळते. अनेक गीतकार, संगीतकार महारथींनी फक्त आपल्या आपल्या भाषांमध्येच न राहता सर्व भाषांमध्ये आपल्या आवाजात गाणी गाऊन प्रेक्षकांसाठी एक सुमधुर मेजवानी तयार केली आहे. महाराष्ट्राला अनेक थोर,मोठ्या गायकांची अशीच महारथ लाभली आहे.(Utkarsh Shinde Gautami Patil)
लता मंगेशकर, आशा भोसले, वसंत देशपांडे, आनंद शिंदे अशा अनेक गायकी घराण्यांनी तसेच अवधूत गुप्ते, अजय-अतुल, महेश काळे, आदर्श शिंदे, उत्कर्ष शिंदे, राहुल देशपांडे , आर्या आंबेकर, सावनी रवींद्र अशा अनेक गायकांनी संगीत सृष्टी अजरामर बनवली आहे. संगीत हे असं माध्यम आहे जे कोणीही मनमुराद शिकू शकत कोणी आवडीसाठी तर कोणी गरज म्हणून. गायकांच्या यादीतील एक गायक असा आहे जो पेशाने जरी डॉक्टर असला तरी त्याच्या आवाजाची जादू प्रेक्षकांना वेड लावते. तो गायक म्हणजे शिंदेशाही कुटुंबातील डॉक्टर उत्कर्ष शिंदे. घरातील इतर गायकां प्रमाणेच उत्कर्ष हि अफलातून गाणी गात प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
अनेक अफलातून गाण्यांच्या निर्मिती नंतर लवकरत उत्कर्षने नवीन गाण्यांची घोषणा करणार असल्याचे सांगितले आहे. आणि विशेष म्हणजे या वेळी उत्कर्ष सोबत सोशल मीडिया वर नेहमी चर्चेत असणारी गौतमी पाटील देखील सहभागी असणार असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात पोस्ट करत उत्कर्ष ने माहिती दिली आहे.
====
हे देखील वाचा – “झूठा..” नवीन गाण्यातून राखीचा आदिल खानला टोला?
===
काय आहे उत्कर्षची पोस्ट(Utkarsh Shinde Gautami Patil)
उत्कर्षने त्याच्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंट वरून संभाषणाचा फोटो पोस्ट करत नवीन गाण्यानं संदर्भात माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे. गौतमी पाटील सोबतच फोटो पोस्ट करत उत्कर्षने कॅप्शन मध्ये लिहिलं आहे “अहो शेट लय दिसान झालीया भेट ” ह्या माझ्या संगीतबद्ध केलेल्या सुपरहिट लावणी नंतर ह्यावर्षी लवकरच तुम्हा सर्वां साठी .माझ नवं लिखाण नवं संगीत नव्या गायके सोबत खूप साऱ्या नवीन लावण्या घेऊन येणार .लवकरच .”
कॅप्शन सोबतच त्याने गौतमीला देखील टॅग केले आहे तर आता उत्कर्षच्या लावणी निर्मितीत गौतमीचा देखील सहभाग असणार का? नृत्यकला दर्शवणारी गौतमी या आता गाण्यांमध्ये देखील आपली कला दाखवणार का हे पाहण्यासाठी गौतमीचे चाहते आतुर दिसत आहे.तर येत्या काळात उत्कर्षची कोणती नवी गाणी, लावण्या प्रेक्षकांचा भेटीला येणार हे पाहणं देखील रंजक ठरणार आहे.