अभिनेत्री गौतमी देशपांडे व स्वानंद तेंडुलकर यांचा काही दिवसांपूर्वीच शाही विवाहसोहळा संपन्न झाला. दोघांचा लग्नसोहळा थाटात पार पडला असून त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. लग्न्नपूर्वी दोघांनी त्यांच्या नात्याची कोणतीच बातमी लागू न देता थेट लग्नापुर्वीच्या विधींना त्यांच्या नात्याची कबुली दिली. गौतमी व स्वानंद यांनी त्यांच्या मेहंदी सोहळ्याला त्यांच्या नात्याचा खुलासा केला. सिनेसृष्टीतील कलाकार मंडळींच्या व जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत गौतमी-स्वानंदचा विवाहसोहळा संपन्न झाला. (Gautami Deshpande And Swanand Tendulkar Dinner Date)
लग्नानंतर गौतमी व स्वानंद फिरायला कोकणात गेल्याचंही पाहायला मिळालं. गौतमी व स्वानंद यांनी त्यांच्या कोकणदौऱ्याचेही अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावरुन शेअर केले होते. धमाल मस्ती करत दोघांनी कोकणातील देवबाग इथे खास हजेरी लावत त्यांचे लग्नानंतरचे काही खास क्षण एन्जॉय केले. यावेळी दोघांनी देवबागच्या समुद्रकिनाऱ्यावर पाण्यातील खास अॅक्टीव्हिटीदेखील केल्या. तसेच त्यांनी समुद्राच्या पाण्यात फ्लाय बोर्डिंगचा खास आनंद लुटला.
कोकणदौरा झाल्यानंतर गौतमी व स्वानंद यांनी शेअर केलेल्या एका स्टोरीने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. गौतमीने स्टोरी पोस्ट करत डिनर डेटचा फोटो पोस्ट केला आहे. डिनर डेटचा शेअर केलेल्या या फोटोमध्ये दारूचा ग्लास व विविध पदार्थ ठेवलेले दिसत आहेत. डिनर डेटच्या या फोटोसह तिने, “माझ्या खास व्यक्तीसह डिनर डेट” असं कॅप्शन देत पोस्ट शेअर केली आहे. तर स्वानंदने ही पोस्ट रिपोस्ट करत, “चल खोटं नको बोलूस” अशी कॅप्शन दिलं आहे.
गौतमी देशपांडे व स्वानंद तेंडुलकर यांच्या लग्नाच्या व रिसेप्शनच्या फोटो व व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला असल्याचं पाहायला मिळालं. त्यांच्या लग्न व रिसेप्शनच्या लूकचीही बरीच चर्चा झाली. दोघांच्या लग्नाआधीचे व लग्नानंतरचे लूक्स चाहत्यांना विशेष आवडले.