मंगळवार, जून 9, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“गेल्या ३५ वर्षांमध्ये…”, अमृता खानविलकरची बहिणीबरोबर पहिल्यांदाच परदेशवारी, एअरपोर्टवरच धमाल-मस्ती अन्..

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 13, 2024 | 1:57 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Amruta Khanvilkar With Sister

“गेल्या ३५ वर्षांमध्ये…”, अमृता खानविलकरची बहिणीबरोबर पहिल्यांदाच परदेशवारी, एअरपोर्टवरच धमाल-मस्ती अन्..

अभिनेत्री अमृता खानविलकरने आजवर तिच्या अभिनयकौशल्याने व तिच्या नृत्यकलेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. अनेक हिट चित्रपट व मालिकांमधून अमृताने साऱ्यांची मन जिंकली. अमृता नेहमीच तिच्या सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून काही ना काही पोस्ट करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अमृताला विशेष लोकप्रियता मिळाली ती म्हणजे ‘चंद्रमुखी’ चित्रपटातील तिच्या ‘चंद्रा’ या भूमिकेमुळे. (Amruta Khanvilkar With Sister)

अमृता नेहमीच तिच्या कामातून वेळात वेळ काढून स्वतःसाठी स्वतःच्या घरासाठी, कुटुंबासाठी वेळ देताना दिसते. अभिनेत्री तिच्या कुटुंबाबरोबरच बरेचदा वेळ घालवताना दिसते. अमृताचं तिच्या कुटुंबावर विशेष प्रेम असलेलं पाहायला मिळतं. ती तिच्या आईबरोबरचे अनेक फोटो कायमच शेअर करत असते. शिवाय ती तिच्या बहिणीच्या मुलांचेही फोटो व रील्स शेअर करताना दिसते. मात्र अमृताने शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

आणखी वाचा – अक्षया देवधरने महिलांना कर्करोगासंदर्भात दिली माहिती, आवाहन करत म्हणाली, “सांगताना खेद वाटतो की…”

View this post on Instagram

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

अमृताने चक्क ३५ वर्षात पहिल्यांदाच बहिणीबरोबर पहिल्यांदा प्रवास करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अमृता व तिची बहीण अदिती परदेशवारीसाठी सज्ज असलेले दिसत आहेत. एअरपोर्टवरील व विमानात बसल्यानंतरचा एक व्हिडीओ अमृताने शेअर केला आहे. व्हिडीओवरुन दोघीही मॉरिशस येथे फिरायला जात असल्याचं समोर आलं आहे. अमृता व अदितीच्या या पहिल्या एकत्र प्रवासात त्यांना निरोप द्यायला त्यांची आई आल्याचंही व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – सोशल मीडियापासून का ब्रेक घेत आहे सायली संजीव? अभिनेत्रीच्या पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाली, “लवकरच…”

अमृताने हा व्हिडीओ शेअर करत, “आणि अशी सुरुवात झाली आहे. ३५ वर्षात फक्त मी व अदिती पहिल्यांदाच एकत्र प्रवास करत आहोत. अनलिमिटेड मनोरंजनासाठी संपर्कात राहा” असं कॅप्शन देत त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांच्या या व्हिडीओला अनेकांनी पसंती दर्शविली आहे. शिवाय चाहत्यांनी प्रवासादरम्यान काळजी घे अशा कमेंटही केल्या आहेत.

Tags: amruta khanvilkaramruta khanvilkar instagramamruta khanvilkar sisterentertainmentmarathi actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
Gautami Deshpande And Swanand Tendulkar Dinner Date

दारुचा ग्लास, विविध पदार्थ अन्…; लग्नानंतर डिनर डेटला गेली गौतमी देशपांडे, फोटो पाहिल्यानंतर नवरा म्हणाला, "खोटं…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.