Gautami Deshpande and Swanand Tendulkar Marriage : कलाकारांची लग्न म्हटल्यावर त्यांच्या पोषाखाची, त्यांच्या दागिन्यांची विशेष चर्चा रंगताना दिसते. सध्या सिनेसृष्टीत लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. एकामागोमाग एक कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकत आहेत. अशातच अभिनेत्री गौतमी देशपांडे व स्वानंद तेंडुलकर यांचा विवाहसोहळा संपन्न झाला आहे. अगदी शाही थाटामाटात त्यांचा विवाहसोहळा संपन्न झाला आहे. गौतमी व स्वानंद यांच्या लग्नसोहळ्याचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
गौतमीच्या लग्नसोहळ्यात समोर आलेल्या फोटोंमधील अभिनेत्रीच्या मंगळसूत्राने लक्ष वेधून घेतलं आहे. कलाकारांच्या गळ्यातील मंगळसूत्र हे प्रेक्षकांसाठी अधिक खास असतं. कारण प्रेक्षक या हटके मंगळसूत्राच्या डिझाइन्स फॉलो करताना दिसतात. आजवर ऋता दुर्गुळे, अभिज्ञा भावे, मिताली मयेकर, शिवानी रांगोळे या अभिनेत्रींच्या मंगळसूत्राची विशेष चर्चा रंगली. यापाठोपाठ आता गौतमीच्या मंगळसूत्राचीही चर्चा रंगेल यांत शंका नाही.
आणखी वाचा – कुर्यात सदा मंगलम्! अखेर गौतमी-स्वानंदचा शाही विवाहसोहळा संपन्न, पहिला फोटो आला समोर
गौतमीने स्वानंदच्या नावाचं मंगळसूत्र घातलं असून दोन डवल्यांच्या पारंपरिक मंगळसूत्राला मॉडर्न टच असलेला पाहायला मिळत आहे. तसेच गौतमीने घातलेल्या टेम्पल दागिन्यांनीही लक्ष वेधून घेतलं आहे. गौतमी व स्वानंद यांचा शाही विवाहसोहळा संपन्न झाला असल्याचं समोर आलं आहे. अगदी पारंपरिक अंदाजात त्यांनी हा विवाहसोहळा उरकला आहे. लग्नासाठी दोघांचा खास लूक पाहणं रंजक ठरतंय. लग्नासाठी गौतमीने पेस्टल रंगाची साडी परिधान केली आहे. तसेच तिच्या दागिन्यांनीही विशेष लक्ष वेधून घेतलं आहे. तर स्वानंदने गौतमीच्या लूकला साजेसा पोशाख परिधान केला आहे.आणखी वाचा – कुर्यात सदा मंगलम्! अखेर गौतमी-स्वानंदचा शाही विवाहसोहळा संपन्न, पहिला फोटो आला समोर
गौतमीच्या लूकमधील नव्या नवरीच्या मंगळसूत्राने अधिक लक्ष वेधून घेतलं आहे. गौतमी व स्वानंद यांच्या लग्नाची बरेच दिवसांपासून चर्चा होती अखेर आता ही जोडी लग्नबंधनात अडकली असून या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. लग्नाआधीचे अनेक विधीही सोशल मीडियावर चाहत्यांना पाहायला मिळत होते. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना लग्नाची उत्सुकता लागली होती आणि अखेर ही जोडी विवाहबंधनात अडकली आहे. त्यामुळे चाहत्यांना खूपच आनंद झाला आहे.