Swanand Tendulkar and Gautami Deshpande Wedding : सध्या सिनेसृष्टीत एका शाही लग्नाची धामधूम पाहायला मिळत आहे. अभिनेत्री गौतमी देशपांडे हिने स्वानंद तेंडुलकरसह लगीनगाठ बांधली आहे. अगदी पारंपरिक अंदाजात व शाही थाटामाटात त्यांचा लग्नसोहळा संपन्न झाला आहे. सोशल मीडियावर स्वानंद व गौतमीच्या लग्नसोहळ्यात अनेक फोटो, व्हिडीओ वाऱ्यासारखे पसरले आहेत. गौतमीच्या या शाही विवाहसोहळ्याने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
दोन दिवसापासून गौतमीच्या लग्नाची धामधूम सुरु असलेली पाहायला मिळत होती. तिच्या हळदी, तसेच संगीत सोहळ्याचीही सोशल मिडियावर हवा पाहायला मिळाली. यानंतर आता ही जोडी लग्नबंधनात अडकलेली पाहायला मिळत आहे. गौतमीच्या लग्नात बहीण मृण्मयीची हवा पाहायला मिळाली. हळदी तसेच संगीत सोहळ्यात मृण्मयीचा डान्सही व्हायरल झाला. बहिणीच्या लग्नाच्या तयारीला मृण्मयीने बरेच दिवस आधी सुरुवात केलेली पाहायला मिळाली.
अशातच लग्न झाल्यानंतर लग्नाचे बरेच फोटो समोर येऊ लागले आहेत. गौतमी व स्वानंदच्या लग्नात कान पिळण्याचा कार्यक्रम पार पडला. यांत स्वानंदचा कान मृण्मयीची बहीण गौतमीने पिळला आहे. नुकताच कान पिळण्याच्या कार्यक्रमाचा फोटो समोर आला आहे. मृण्मयीसह त्यांचे भाऊदेखील स्वानंदचा कान पिळताना दिसत आहेत.