रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आली लग्नघटिका समीप! रकुल प्रीत सिंग व जॅकी भगनानी गोव्यातील ‘या’ आलिशान हॉटेलमध्ये करणार शाही विवाहसोहळा, जय्यत तयारी सुरु

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 14, 2024 | 5:39 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Rakul Preet Singh Jackky Bhagnani Wedding

आली लग्नघटिका समीप! रकुल प्रीत सिंग व जॅकी भगनानी गोव्यातील 'या' आलिशान हॉटेलमध्ये करणार शाही विवाहसोहळा, जय्यत तयारी सुरु

रकुल प्रीत सिंग व जॅकी भगनानी यांच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. २१ फेब्रुवारीला रकुल व जॅकी लग्नबंधनात अडकणार आहेत. याआधीही त्याच्या लग्नाबाबत अपडेट येत होत्या. सुरुवातीला हे जोडपं परदेशात विवाहगाथा बांधणार होतं मात्र त्यानंतर आता त्यांनी त्यांचं लग्नाचे ठिकाण बदलल असून ते आता भारतात लग्न करणार आहेत. नकुल व जॅकी यांच्या लग्नाला कुटुंबीय व जवळचे मित्र उपस्थित राहणार असून २१ फेब्रुवारी रोजी त्यांचा शाही विवाहसोहळा गोव्यात होणार आहे. २० फेब्रुवारीला मेहंदी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर संध्याकाळी संगीत पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. (Rakul Preet Singh Jackky Bhagnani Wedding)

लग्नाला उपस्थित राहिलेल्या एका पाहुण्याने खुलासा करत सांगितलं की, “मेहंदीमध्ये कार्निव्हल वातावरण तयार करण्यापासून लग्नासाठी पेस्टल टोन निवडण्यापर्यंत, प्रत्येक फंक्शनची थीम वेगळी ठेवण्यात आली आहे”. ‘इंडिया टुडे’च्या वृत्तानुसार, रकुल प्रीत सिंह व जॅकी भगनानी यांचा भव्य विवाहसोहळा दक्षिण गोव्यातील ‘आयटीसी ग्रँड’ या आलिशान हॉटेलमध्ये होणार आहे. डेस्टिनेशन वेडिंगसाठी जवळचे मित्र व कुटुंब उपस्थित राहणार आहेत. या जोडप्याच्या जवळच्या सूत्राने सांगितले की, “दोघांनी गोव्यातील ‘आयटीसी ग्रँड’ हे हॉटेल निवडले आहे. गोव्याच्या शांत परिसरात वसलेली प्रशस्त मालमत्ता त्यांच्या सर्व उत्सवांसाठी योग्य आहे”, असंही ते म्हणाले.

आणखी वाचा – ‘सिंघम अगेन’ चित्रपटातील अर्जुन कपूरचा खतरनाक लूक आला समोर, दिसणार ‘या’ खास भूमिकेत

View this post on Instagram

A post shared by Rakul Preet ???? (@rakul.preet143)

पुढे ते असंही म्हणाले की, “पाहुण्यांना फंक्शन व लग्नाच्या कलर थीमबद्दलदेखील माहिती देण्यात आली आहे. हे एक बीच वेडिंग आहे. रकुल व जॅकी या दोघांनाही समुद्र आवडतो, त्यामुळे त्यांच्या लग्नासाठी समुद्राशेजारी असणाऱ्या लोकेशनची निवड करण्यात आला आहे. हनिमूनचा कोणताही प्लॅन नाही कारण दोघेही लग्नानंतर लगेच कामावर परतणार आहेत”.

आणखी वाचा – हटके इंटिरिअर, स्वादिष्ट जेवण अन्…; शाहरुख खानच्या बायकोने मुंबईत सुरु केलं स्वत:चं आलिशान हॉटेल, सगळं काही आहे खास

तत्पूर्वी, त्यांच्या लग्नाचे ठिकाण भारतात ठेवण्याच्या निर्णयाबद्दल बोलताना एका सूत्राने सांगितले की, “रकुल व जॅकीने सुरुवातीला त्यांचे लग्न प्रदेशात करण्याची योजना आखली होती. सुमारे सहा महिन्यांपूर्वी, सर्वकाही अगदी नियोजित होते. मात्र, डिसेंबरमध्ये भारतीय पंतप्रधानांच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर त्यांनी भारताची निवड करण्याचा विचार केला. त्यानंतरच रकुल व जॅकीने त्यांचा प्लॅन बदलला” असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

Tags: bollywood newsentertainmentJackky Bhagnani WeddingRakul preet singhRakul Preet Singh Jackky Bhagnani Wedding
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
shilpa shetty letter to PM Modi

राम मंदिरावरुन शिल्पा शेट्टींने मोदींसाठी लिहिले खास पत्र, म्हणाली, "काही जण इतिहास वाचतात, तुम्ही…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.