मराठीत आता नवनवीन चित्रपट येऊ घातले आहेत. एप्रिल व मे महिन्याच्या प्रत्येक शुक्रवारी आता विविध कथांवर आधारित मराठी चित्रपट चित्रपटगृहांमध्ये दाखल होत आहेत. विशेष म्हणजे मराठीत आता नवनवीन प्रयोग होत आहेत. प्रेक्षकांची पसंती लक्षात घेता नवे प्रयोग चित्रपटसृष्टीमध्ये सुरु आहेत. नव्या कथांपासून ते नवनवीन तंत्रज्ञानांचा वापर मराठीतील दिग्दर्शक व निर्माते करु इच्छित आहेत. आता असाच एक प्रयोग मराठीमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. तो प्रयोग म्हणजे AI च्या आधारे चित्रपट बनवणं. मराठीमध्ये AI च्या आधारे चित्रपट बनवण्याचा हा पहिलाच प्रयोग असणार आहे. चित्रपटवेड्या अवलियाने या तंत्रज्ञानाचा आधार घेण्याचं ठरवलं आहे. (Marathi movie with AI technology)
सध्या सगळीकडे AI तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. हाच वाढता वापर लक्षात घेता दिग्दर्शक अभिजीत वारंगने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मराठीमध्ये AIच्या आधारे चित्रपट बनवण्याची घोषणा त्याने केली आहे. ‘नरकासुर वध’ असं या चित्रपटाचं नाव आहे. ‘नरकासुर वध’ चित्रपटामधील व्यक्तीरेखाच AI च्या मदतीने साकरण्यात येणार आहेत. ही खरंच कौतुकास्पद बाब आहे.
आणखी वाचा – सातासमुद्रापलिकडे मराठीचीच हवा, कान फिल्म फेस्टिव्हलसाठी ‘जुनं फर्निचर’ सह चार चित्रपटांची निवड
कोकणासह गोव्यातही दिवाळीच्या आदल्या दिवशी नरकासुर बवण्याच्या फार वर्षांपासूनची परंपरा आहे. गवत, कागद व रंगीबेरंगी कपड्यापासून नरकासूर तयार करण्यात येतो. त्यानंतर त्यांची गावभर मिरवणूक काढली जाते. हा कार्यक्रम झाल्यानंतर दिवाळीच्या पहिल्याच दिवशी त्याचा वध केला जातो. म्हणजे नरकासुराला जाळलं जातं. या प्रथेमधून एक महत्त्वाचा संदेश देण्यात येतो. वाईट प्रवृत्तींचा नाश करत चांगल्या दिवसाची सुरुवात असा याचा उद्देश असतो.
आणखी वाचा – ‘फ्रँड्री’मधल्या शालूने बदलला धर्म, फोटो शेअर करताच ट्रोल, मोठा निर्णय अन्…
‘नरकासुर वध’ चित्रपटामधूनही हाच संदेश देण्यात येणार आहे. हेच अभिजीत वारंगनेही सांगितले. सिने पिकासो निर्मित या चित्रपटाचे चित्रीकरण जूनमध्ये पूर्ण होईल. ‘नरकासुर वध’ हा चित्रपट म्हणजे नव्या तंत्रज्ञानाशी संबंधित उत्तम संदेश देणारा चित्रपट ठरणार आहे. चित्रपटाचं काम पूर्ण झाल्यानंतर २०२५च्या दिवाळीच्या पहिल्याच दिवशी ‘नरकासुर वध’ चित्रपटगृहांमध्ये दाखल होईल.