Marathi Art Director Nitin Desai Commits Suicide : चित्रपट कोणत्याही भाषेतील असो रुपरी पडद्यावर पाहताना तो कसा दर्शवला जातो त्यावर ही प्रेक्षकांचं आकर्षण अवलंबून असतं. लगान, जोधा अकबर, हम दिल दे चुके सनम, परिंदा, बालगंधर्व, हरिश्चंद्राची फॅक्ट्री अशा अनेक चित्रपटांच्या यशामध्ये महत्वाचा सहभाग होता कला दिग्दर्शक नितीन देसाई यांचा. परंतु मनोरंजन सृष्टीचं दुर्दैव कि आज नितीन देसाई यांच्या आत्म्हत्येची बातमी समोर आली. नितीन देसाई यांनी उभारलेला एन.डी. स्टुडिओ येथे त्यांनी गळफास घेत आत्महत्या केल्याचं वृत्त आज सकाळी समोर आलं. संपूर्ण मनोरंजन या घटनेने हादरून गेलं आहे. त्यांच्या आत्महत्येमागचं कारण अद्यापही स्पष्ट झालं नाही. अनेक कलाकार नितीन देसाई यांच्या सोबतच्या आठवणीं बद्दल व्यक्त होताना ही दिसत आहेत.(Nitin Desai At Lalbaughcha Raja)
नितीन देसाई यांनी काही दिवसांपूर्वीच मुंबईच आद्य दैवत मानल्या जाणाऱ्या लालबागच्या राजा निम्मित खास पोस्ट शेअर केली होती. नितीन यांच्या पोस्ट वरून लक्षात येत होतं कि लालबागच्या राजाच्या ९० व्या वर्षी राजाचा मंडप सजवण्याचं काम आणि इतर दृश्य सजावटीचं काम नितीन देसाई करणार होते. नितीन देसाई यांनी लालबागच्या राज्याच्या सजावटीचा श्री गणेशा करतानाचे काही फोटो इंस्टाग्राम वरून शेअर केले होते. या फोटोंना त्यांनी “लालबागच्या राजाचा विजय असो, लालबागच्या राजाचा विजय असो।।लालबागच्या राजाच्या ९० व्या वर्षीच्या मंडप पुजन आणि सजावटीचा श्री गणेशा आज संपन्न झाला. गणपती बाप्पा मोरया।।” असं कॅप्शन देखील दिलं होतं.(Nitin Desai commits suicide)
हे देखील वाचा- नितीन देसाई यांच्या आत्महत्येनंतर अभिनेते आदेश बांदेकर भावुक, म्हणाले “त्याने त्याच्या मनातील व्यथा…”
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “आमच्यासाठी ही दु:खद आणि धक्कादायक बातमी आहे. ते रविवारी आमच्यासोबत जवळपास दोन तास त्यांच्या टीमसह पंडालच्या कामावर लक्ष ठेवून होते. असे काही घडू शकते याचा कोणताही मागमूस नव्हता. देसाई हे लालबागच्या राजाचे भक्त होते आणि ते 2009 पासून आमच्याशी जोडले गेले. कदाचित एक वर्ष त्यांची तब्येत खराब असताना त्यांनी पंडालची रचना केली नसावी अन्यथा ते नंतर आमच्यासोबत होते. यावर्षी ही त्यांनी नेहमीप्रमाणे वेळेवर काम पूर्ण केले आणि त्याचे सर्वांनी कौतुक देखील केले. त्यामुळे त्याची आत्महत्या अत्यंत धक्कादायक बातमी आहे.”(Nitin Desai At Lalbaughcha Raja)
हे देखील वाचा- “त्याच्याशी बोलायला हवं होतं”, नितीन देसाईंच्या निधनानंतर महेश मांजरेकर भावुक, म्हणाले, “त्याला मी शेवटचं पाहिलं तेव्हा…”
काही वर्षांपूर्वी स्टुडिओला भीषण आगीचा देखील सामना करावा लागला होता. एका चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान सेटवर अचानक आग लागली आणि सेटवरील बरीच मालमत्ता जाळून खाक झाली. नितीन देसाई यांच्या जाण्याने भावुक झालेल्या महेश मांजरेकर, महेश कोठारे, प्रवीण तरडे, सुबोध भावे, आदेश बांदेकर यांच्यासह अनेक कलाकारांनी त्यांच्या सोबतच्या काही आठवणी देखील शेअर केल्या आहेत.(nitin desai suicide news)