Marathi Art Director Nitin Desai Commits Suicide : मराठी, हिंदी चित्रपट सृष्टीला हादरवून टाकणारी एक घटना आज घडली. प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी एन.डी.स्टुडिओ मध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याची बातमी समोर आली. नितीन देसाई यांच्या निधनानंतर संपूर्ण मनोरंजनविश्व शोकसागरात बुडालं. अनेक कलाकार, दिग्दर्शक, लेखक यांनी नितीन देसाई यांना श्रद्धांजली वाहिली. नितीन देसाई यांच्या निधनाची बातमी ऐकून अभिनेते आदेश बांदेकर व जितेंद्र जोशी देखील भावुक होताना दिसले. एबीपी माझाशी संपर्क साधून आदेश बांदेकर व जितेंद्रने त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.(Aadesh Bandekar Reacts On Nitin Desai Suicide)
अभिनेते आदेश बांदेकर भावुक होऊन म्हणाले, “हा खूप मोठा धक्का आहे. स्वप्नपूर्तीच्या ध्येयाने झपाटलेला माणूस कसा असावा हे कायम आम्ही नितीन मध्ये अनुभवलं आहे. कला दिग्दर्शनाच्या माध्यमातून महाराष्ट्राचं नाव जगाच्या नकाशावर नेऊन ठेवण्यात त्याचा मोलाचा वाटा आहे. हे कोणी नाकारू शकणार नाही. नितीन हा जगन्मित्र होता, प्रत्येकाशी त्याचे मैत्रीपूर्ण संबंध होते. मला जेव्हा हे समजलं तेव्हा हा माझ्यासाठी खूप मोठा धक्का होता. त्याने असं काही करण्याआधी बोलायला हवं होतं. सिद्धिविनायकाच्या दर्शनाला आल्यावर त्याचा फोन यायचा. अनेक टप्प्यांवर मी त्याचा प्रवास बघितला आहे. कधी तरी त्याचा फोन यायचा पण त्याने कधी त्याचा मनातील व्यथा बोलून दाखवली नाही.”(Aadesh Bandekar Reacts On Nitin Desai Suicide)
नितीन यांच्या जाण्याने जितू ही भावुक(Nitin Desai commits suicide)
आदेश बांदेकर यांच्या सोबतच अभिनेता जितेंद्र जोशीने सुद्दा त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. नितीन देसाई यांच्या निधनानंतर व्यक्त होताना जितेंद्र म्हणाला “मी माझं भाग्य समझतो मला त्यांचा सहवास लाभला, त्यांच्या सोबत काम करण्याची संधी मिळाली. आधुनिक विश्वकर्मा असं त्यांना संबोधलं जायचं. नितीन यांचं असं अचानक जाणं ही कधीही भरून न निघणारी हानी आहे. मी अभिनय क्षेत्रात येण्याआधी कला दिग्दर्शन काय असतं हे त्यांच्या कामाकडे बघून शिकलो होतो. एवढा दमदार माणूस असून त्यांनी असं का केलं हे काही समजत नाही. शून्यातून सुरु करून एन.डी. स्टुडिओ सारखा एवढा मोठा स्टुडिओ उभं करणं सोप्प न्हवत. अनेक जागतिक चित्रपट त्यांच्या नावावर आहेत.”(nitin desai death news in marathi)
हे देखील वाचा- Nitin Desai Suicide: सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या, कर्जत येथील एन. डी. स्टुडिओमध्येच संपवलं जीवन
नितीन देसाई यांच्या निधनानंतर प्रत्येक स्तरातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. मराठी मधील बालगंधर्व, हरिश्चंद्राची फॅक्टरी तर हिंदी मधील लगान, जोधा अकबर अशा अनेक लोकप्रिय ठरलेल्या चित्रपटाच्या शूटिंग मध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. शिवाय अमोल कोल्हे यांच्या लोकप्रिय ठरलेल्या ‘राजा शिवछत्रपती’ या मालिकेचं शुटिंग देखील नितीन देसाई यांचा स्टुडिओमधेच पार पडलं होतं.