Female Audience Slaps Telugu Actor : तेलुगू अभिनेता एनटी रामास्वामीचा एक व्हिडीओ अगदी प्रत्येकाला आश्चर्यचकित करणारा आहे. अभिनेता त्याच्या ‘लव्ह रेड्डी’ चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी पोहोचला होता आणि तेव्हा एका महिलेने त्याला स्टेजवर जाऊन त्याच्या जोरात कानाखाली मारली. त्याच्या ‘लव्ह रेड्डी’ चित्रपटाच्या प्रीमियरच्या वेळी तो जल्लोष, आनंद साजरा करण्याच्या वातावरणात मग्न होता, त्याला पुढच्या क्षणी काय होणार आहे याची कल्पनाही नव्हती. या चित्रपटात त्याने खलनायकाची भूमिका साकारली आहे. हैदराबादमध्ये NT रामास्वामी आपल्या सहकलाकारांसह स्क्रीनिंगला उपस्थित होते. चित्रपटातील कलाकार चित्रपटाबद्दल बोलण्यात व्यस्त असताना हा अपघात झाला.
कलाकार चित्रपटाबद्दल बोलत होते, तेव्हा एक महिला स्टेजवर आली. ती खूप वेगाने अभिनेत्याकडे गेली. लोकांना काही समजण्याआधीच महिलेने त्याची कॉलर पकडून त्याच्या कानाखाली मारली. त्याच्या ऑनस्क्रीन भूमिकेबद्दल महिलेला राग असल्याचे बोलले जात आहे. या प्रसंगाचा व्हिडीओ ट्विटरवर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सुरुवातीला एक क्लिप दाखवली जात आहे जी ‘लव रेड्डी’च्या सीनची आहे.
चित्रपटामध्ये अभिनेत्याचे पात्र आधी स्वत:च्या डोक्यावर विटाचा तुकडा मारतो आणि नंतर अभिनेत्रीच्या डोक्यावर मारतो. यानंतर प्रेक्षक सिनेमागृहात टाळ्या वाजवताना दिसत आहेत. इतक्यात एक महिला येऊन अभिनेत्याच्या कानाखाली मारते. आणि मुख्य जोडप्याचा छळ का झाला असा जाब विचारते. ज्यावर लोक स्पष्ट करतात की, हा फक्त एक चित्रपट आहे. बरं, तिथे जे काही घडलं त्यामुळे एनटी रामास्वामी खूप हादरले आहेत.
आणखी वाचा – रणबीर कपूर पापाराझींवर ओरडताच आलिया घाबरली, पार्टीतून बाहेर आल्यावर घडला ‘हा’ प्रकार, नेमकं काय झालं?
अभिनेता अंजन रामचंद्र, श्रावणी कृष्णवेणी यांच्यासह थिएटर सुरक्षा कर्मचारी आणि कलाकार अभिनेत्याला वाचवण्यासाठी पुढे आले. यानंतर सुरक्षारक्षकांनी महिलेला तेथून बाहेर काढले. स्मरण रेड्डी दिग्दर्शित ‘लव्ह रेड्डी’ हा चित्रपट एक उत्कृष्ट प्रेमकथा आहे. हा चित्रपट मुख्य पात्र नारायण रेड्डीभोवती फिरतो, जो स्वतःला भावनांच्या जाळ्यात अडकवतो. एनटी रामास्वामी या चित्रपटात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत कारण त्यांची भूमिका मुख्य कलाकारांच्या आयुष्यात चढ-उतार आणते. लव रेड्डीची निर्मिती Mythri Movie Makers ने केली आहे. हा चित्रपट १८ ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.