Salt Workers Life : हिंदू धर्मात मृत्यूनंतर मृतदेह जाळला जातो हे साऱ्यांनाच ज्ञात आहे. पण तुम्हाला हे माहीत आहे का मिठाच्या कारखान्यात काम करणारे असे अनेक कामगार आहेत ज्यांचे पाय त्यांच्या मृत्यूनंतर जळत नाहीत. अर्थात हे विधान खूप विचार करण्यासारखे आहे कारण सामान्य आयुष्यात मीठ एक मोठी भूमिका बजावते. कारण मीठाशिवाय चांगले पदार्थही वाईट लागतात. गरीब असो वा श्रीमंत प्रत्येकासाठी मीठ सारखीच भूमिका बजावते. प्रत्येकाच्या खाण्यात मिठाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण मीठ कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांची अवस्था किती गंभीर आहे, हे फार कमी जणांना ठाऊक असेल. मीठ कारखान्यातील मजदूर किती त्रासातून जात असतात याबाबत आज थोडक्यात जाणून घेणार आहोत.
मीठ काढणाऱ्या मजुरांना ‘अगरिया’ या नावाने संबोधले जाते. विशेषत: भारतात गुजरात राज्यातून मिठाचा पुरवठा केला जातो. गुजरातमधील मीठ उत्पादन क्षेत्रात ५०,००० हून अधिक मजूर काम करतात. गुजरातमधील खाराघोडा भागातील आगरिया समाजाचे लोक वर्षातील नऊ महिने मिठाच्या शेतात घालवतात. जिथे दूरवर पांढरी शेतं आहेत. या काळात मीठ कामगार कठीण परिस्थितीत काम करतात. पण मिठाच्या अवतीभोवती काम करणारे कामगार मरण पावतात तेव्हा अनेक वेळा त्यांचे पाय चितेत जळत नाहीत.
मिठाच्या प्रभावामुळे त्यांचे शरीर कठोर बनल्यामुळे असे घडते. मिठामुळे या मजुरांच्या पायावर जाड थर साचतो, त्यामुळे मृत्यूनंतर त्यांचे पाय चितेत जळत नाहीत. त्याचबरोबर मीठ बनवणाऱ्या कामगारांचे पाय इतके जड होतात की जळल्यानंतरही ते जळत नाही. मिठाच्या शेतात काम करणाऱ्या मजुरांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. त्यामुळेच त्यांचे पाय जड झाल्याने त्यांना पुन्हा आगीत टाकू जाळले जाते.