दिग्गज अभिनेत्री मुमताज यांची मुलगी नताशा माधवानी हिच्याशी लग्न करणारा फरदीन खान लग्नाच्या १८ वर्षांनंतर वेगळे होणार असल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फरदीन आणि नताशा यांनी न जुळणार्या मतभेदांमुळे त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. (Fardeen, Natasha headed for divorce?)
फरदीन खान आणि नताशा माधवानी घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान या चर्चा ऐकून त्यांच्या विभक्त झाल्याच्या बातम्यांनी अनेकांना धक्का बसला आहे, कारण या जोडप्याने त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल नेहमीच गोपनीयता बाळगली. दोघांनी त्यांच्या विभक्त होण्याबद्दल अधिकृत विधान अद्याप जारी केलं नसलं तरी, सूत्रांमते असं समोर आलं आहे की, ते विभक्त होत आहेत.
पाहा का घेत आहेत फरदीन आणि नताशा घटस्फोट (Fardeen, Natasha headed for divorce?)
ईटाइम्स ने दिलेल्या रिपोर्टनुसार, “फरदीन आणि नताशा बऱ्याच काळापासून समस्यांना तोंड देत होते आणि शेवटी त्यांनी आपले मार्ग वेगळे करण्याचा निर्णय घेतला. ते दोघे विभक्त झाले असले तरी त्यांनी, आश्वासन दिले आहे की त्यांच्या मुलांचे कल्याण हे त्यांचे प्राधान्य आहे. काही काळापासून ते वेगळे राहत असल्याची बातमी ही समोर आली आहे. सध्या फरदीन मुंबईत असून नताशा लंडनमध्ये आहे.”
हे देखील वाचा – “जर दारू माझ्या आयुष्यात नसती तर..” सुपरस्टार रजनीकांत यांचं वक्तव्य चर्चेत
फरदीन आणि नताशा यांनी डिसेंबर २००५ मध्ये लग्न केले आणि त्यांना दोन मुले आहेत. फरदीन खान हा ज्येष्ठ अभिनेते फिरोज खान यांचा मुलगा आहे. त्याने १९९८ मध्ये ‘प्रेम अगन’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ‘जंगल’, ‘हे बेबी’ आणि ‘नो एंट्री’ यांसारख्या चित्रपटांतील भूमिकांसाठी तो ओळखला जातो.
