farah khan net worth : बॉलिवूडच्या ‘बिग सेलेब्स’च्या घरी यूट्यूब व्हिडीओ बनवणारी फराह खान स्वत: ला गरीब म्हणते. परंतु आपणास माहित आहे का, ती आजही कोट्यवधी रुपये कमावते. तिने ११ वर्षांपासून कोणत्याही चित्रपटाचे दिग्दर्शन केले नाही. तरीही अभिनेत्री कोट्यवधी रुपयांची मालकीण कशी आहे हा प्रश्न आजही साऱ्यांना सतावत आहे. फराह खान करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात दिग्दर्शक, नृत्यदिग्दर्शक, एक नर्तक, लेखक, निर्माता आणि अभिनेत्री आहेत. १०० हून अधिक गाण्यांचे आणि ८० हून अधिक चित्रपटांचे नृत्यदिग्दर्शन तिने केले आहे. याशिवाय फराहने राष्ट्रीय पुरस्कार जिंकला.
साऊथ सिनेविश्वातही तिने बरंच काम केलं. तिने ‘मैं हूं ना’ चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकलं आणि या चित्रपटामुळे ती विशेष चर्चेत आली. इतकंच नाहीतर त्याच्या ३ वर्षांनंतर, ‘ओम शांती ओम’ चित्रपटानेही ती चर्चेत आली. परंतु गेल्या ११ वर्षांपासून तिने कोणताही चित्रपट बनविला नाही. मात्र सध्या फराह खान युट्युब व्हिडीओ बनविण्यात व्यस्त आहे. ज्यामध्ये ती बॉलिवूडच्या मोठ्या सेलिब्रिटींच्या घरी जाते आणि त्यांच्याकडून खाद्यपदार्थ बनवून घेते. तिचे आणि तिचा कुक दिलीपचे हे व्हिडीओ तुफान व्हायरल होतात.
आणखी वाचा – अहिल्यादेवींची तब्येत खालावली; आदित्य-पारू मदतीसाठी धावणार, किर्लोस्कर मेन्शनमध्ये एंट्री घेणार आणि…
९ जनवरी १९६५ मध्ये बॉम्बे (मुंबई) येथे जन्मलेल्या फराह खानचे वडील कामरन खान हे एक स्टंटमॅन होते, जे नंतर चित्रपट निर्माते बनले. त्याची आई मानेका इराणी अभिनेत्री हनी इराणी आणि डेझी इराणीची बहीण आहेत. फराहने सेंट झेवियर कॉलेजमधून समाजशास्त्रात शिक्षण घेतले. मायकेल जॅक्सनचा संगीत व्हिडिओ ‘थ्रिलर’ मधील गाण्याने ती खूप प्रभावित झाली. फराह यापूर्वी कधीही नाचली नव्हती, परंतु कालांतराने तोच तिचा व्यवसाय झाला.
आणखी वाचा – हॉस्पिटलमध्ये ओळख, १५ वर्षांचं अंतर ते लग्न; सयाजी शिंदेंची हटके लव्हस्टोरी, पहिली भेट…
फराहने २००४ मध्ये प्रथमच दिग्दर्शनाच्या जगात प्रवेश केला. शाहरुख खान आणि सुष्मिता सेन यांचा चित्रपट ब्लॉकबस्टर होता. त्यानंतर २००७ मध्ये ‘ओम शांती ओम’ बनविला. यातून दीपिका पादुकोणला लाँच केले. शाहरुख खानबरोबर तिची जोडी हिट ठरली. हा चित्रपट अनेक सेलिब्रिटींच्या कॅमिओ आणि जबरदस्त कथा-अभिनयासह ब्लॉकबस्टर असल्याचे सिद्ध झाले. फराहने २०१४ मध्ये ‘हैप्पी न्यू ईयर’ हा चित्रपट बनविला. यांत तिने पुन्हा शाहरुख खान आणि दीपिका पादुकोणला कास्ट केले. अभिषेक बच्चन आणि आणखी बरेच कलाकारही यांत दिसले. पण तो चित्रपट तितकासा चालला नाही. यानंतर फराहने कोणताही चित्रपट दिग्दर्शित केला नाही. फराह खान आणि तिचा नवरा शिरिश कुंदर जो तिच्यापेक्षा ८ वर्षांनी लहान आहे त्यांनी मिळून ‘थ्री कंपनी’ प्रॉडक्शन कंपनीची सुरुवात केली. आयव्हीएफच्या माध्यमातून जन्म दिलेल्या त्यांच्या तीन मुलांच्या सन्मानार्थ या कंपनीचे नाव ठेवले. नृत्यदिग्दर्शन आणि टीव्ही शोवरील न्यायाधीशांव्यतिरिक्त, फराह खान आता सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. YouTube vlog व्यतिरिक्त, ब्रँड एन्डोर्समेंटमधूनही ती खूप कमाई करते.





