शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

कुकने पाहुण्यांसमोरच वाढवून मागितला पगार, फराह खान भडकून म्हणाली, “तुझा पगार सांगितला तर…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 14, 2025 | 3:05 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Farah Khan Cook Dilip

कुकने पाहुण्यांसमोरच वाढवून मागितला पगार, फराह खान भडकून म्हणाली, “तुझा पगार सांगितला तर...”

Farah Khan Cook Dilip  : फराह खान सध्या त्यांच्या स्वयंपाक घरातील गमतीशीर व्हिडीओंमुळे चर्चेत असतात. त्या कलाकारांसह त्यांच्या स्वयंपाक घरात जेवण बनवताना दिसतात. त्यांचे हे स्वयंपाक घरातील व्हिडीओ चर्चेत असतातच पण यांत अधिक चर्चेचा विषय ठरतो तो म्हणजे दिलीप. हो. फराह खान यांचे हे व्हिडीओ व्हायरल होण्यामागचं मुख्य कारण म्हणजे त्यांचा कुक दिलीप. गेल्या दहा महिन्यांपासून फराह खान यांचे स्वयंपाकाचे व्हिडीओ केवळ व्हायरल झाले नाहीत तर कुक दिलीप देखील प्रसिद्ध झाला आहे. बऱ्याच व्हिडीओमध्ये फराह खान आणि त्यांच्या कुकची मजेदार संवाद लक्षवेधी ठरतात. त्यांचे हे खास बॉण्डिंग उपस्थित कलाकारांसह प्रेक्षकांच्याही पसंतीस पडते. दिलीप उत्तम कुक असून तो नेहमीच त्याच्या हातच्या चवीने साऱ्यांचं मन जिंकतो.

अलीकडेच फराहने आपला व्हीलॉग शेअर केला, ज्यामध्ये तिचा कुक दिलिप पगार वाढवण्यास सांगताना दिसत होता. यावर, फराहने दिलीपच्या पगाराबाबत थेट व्हिडीओमध्ये हिंट दिली. फराह खानने त्याच्या नवीनतम व्हीलॉग शेफ विकास खन्ना यांच्या स्टुडिओ किचनमध्ये शूट केला. या भागासाठी तिने अभिनेता सनी सिंग यांना आमंत्रित केले. जेव्हा व्हिडीओ सुरु होता, तेव्हा फराह आणि तिचा कुक दिलीप यांच्यातील संवाद ऐकून खूप मजा आली. यानंतर, जेव्हा फराह स्वयंपाकघरात आली तेव्हा तिच्या कुकने स्वयंपाकघरात एसी नसल्याने टोमणे मारले.

आणखी वाचा – “आई खूपच काय काय करते” म्हणत मधुराणी प्रभुलकरचे संस्कार काढणारे तुम्ही कोण?

View this post on Instagram

A post shared by Farah Khan Kunder (@farahkhankunder)

यानंतर, अभिनेता सनी सिंग, स्वयंपाकघरात प्रवेश करताच, थेट विचारतो. “तुमच्याकडे अडीच किलोचा हात नाही का?”, हे ऐकून, फराह दिलीपला म्हणते, “तुला लाज वाटली नाही का?”. यानंतर, सनी सिंगने आपल्या चित्रपटांची नावे आठवण करुन देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला काहीच आठवत नाही. यानंतर, सनी सिंगने तिच्या कुकच्या मदतीने पनीर बुर्जी आणि लस्सी बनवली. आणि तिघांनीही त्याचा आस्वाद घेतला. शेवटी सनी सिंह दिलीपला पंजाबी भाषा शिकवतो आणि त्याचा पगार विचारतो. यावर, दिलीप फराह खानकडे आपला पगार वाढवण्याची मागणी करतो.

आणखी वाचा – Video : रॅम्प वॉकदरम्यान दोनदा अडखळली, स्वतःला सावरलं अन्…; हिना खाननेच कॅन्सरला हरवलं, तिच्याकडे पाहून वाटलं…

ज्यावर फराह सनीला म्हणते, ‘जर मी तुला याचा पगार सांगितला ना तर रोहित तुला सोडून माझ्याकडे येईल”.
त्याच वेळी, फराह खानने आणखी एका व्हीलॉगमध्ये सांगितले होते की, गावात सहा बेडरूम असलेला तीन मजली बंगला आणि वैयक्तिक तलाव आणि शेतजमीनही आहे.

Tags: bollywood newsfarah khanFarah Khan Cook Dilip
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Comedian Bank Janardhan Passes Away

कन्नड अभिनेते बैंक जनार्दन यांचे निधन, ७७ व्या वर्षी अखेरचा निरोप, कलाविश्वाला मोठा धक्का

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.