‘फ्रँड्री’ चित्रपटामधील जब्या व शालूचा वेगळाच चाहतावर्ग आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन बरीच वर्ष उलटली तरी ही जोडी अजूनही प्रेक्षकांच्या आठवणीत आहे. चित्रपटातील शालू म्हणजेच अभिनेत्री राजेश्वरी खरात सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. ‘फ्रँड्री’ने तर तिचं नशिबच बदललं. या चित्रपटानंतर ती नावारुपाला आली. त्यानंतर तिने मराठीत फार काम केलं नाही. इंडस्ट्रीपासून राजेश्वरी दूर असली तरी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ती चर्चेत असते. आता तर राजेश्वरीने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्याचीच सध्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहे. तिने धर्म बदलला असं सुचवणारी पोस्ट शेअर करताच सगळ्यांचा एकच गोंधळ उडाला. आता राजेश्वरीने याबाबत भाष्य केलं आहे. (rajeshwari kharat on accepted Christian religion)
खरंच राजेश्वरी खरातने धर्म बदलला का?
राजेश्वरीने नव्या आयुष्याची सुरुवात म्हणत पांढऱ्या रंगाच्या कपड्यांमध्ये काही फोटो शेअर केले. हे फोटो शेअर करताना तिने ख्रिश्नच धर्माचा स्वीकार केल्याचं दिसून आलं. या फोटोंद्वारे तिला बरंच ट्रोल करण्यात आलं. धर्मावरुन नको नको त्या कमेंट करण्यात आल्या. इतकंच काय तर हिला अनफॉलो करा अशा सतत कमेंट येऊ लागल्या. आता हे नक्की काय प्रकरण आहे याबाबत राजेश्वरीने स्वतः सांगितलं आहे.
आणखी वाचा – ‘फ्रँड्री’मधल्या शालूने बदलला धर्म, फोटो शेअर करताच ट्रोल, मोठा निर्णय अन्…
काय म्हणाली राजेश्वरी खरात?
राजेश्वरीने इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे तिचं मत मांडलं. तसेच ट्रोलर्सला अगदी सडेतोड उत्तर दिलं. ती म्हणाली, “निवडणुका, प्रत्येकी ५०० रुपये, किराणा भरुन पिशव्या, दारु व हॉटेलला जेवण आणि साहेब, दैवत, देव माणूस… हे आज धर्म, जात शिकवायला आले आहेत तर तुमचं स्वागत. कोणी पैशांसाठी किंवा अन्नासाठी दुसरा धर्म स्वीकारतात तर कोणी मतदान करतात. माझ्या मते एकतर दोघे बरोबर किंवा दोघेही चुकीचे”.

आणखी वाचा – सातासमुद्रापलिकडे मराठीचीच हवा, कान फिल्म फेस्टिव्हलसाठी ‘जुनं फर्निचर’ सह चार चित्रपटांची निवड
या पोस्टमध्येच राजेश्वरीने महत्त्वाची टीप सांगितली. ती म्हणाली, “टीप – माझा जन्म ख्रिस्ती कुटुंबातील आहे आणि मी सर्व धर्माचा आदर करते. बाकी वरील पोस्ट मनोरंजक हेतूने स्वीकारली जावी एवढी विनंती”. या पोस्टद्वारे राजेश्वरीने ती ख्रिस्तीच कुटुंबातील आहे हे ठळकपणे सांगितलं आहे. मात्र शेअर केलेले फोटो आणि त्यामध्ये नदीमध्ये तिने केलेलं स्नान नक्की काय आहे? याबाबत तिने बोलणं टाळलं आहे.