सोमवार, जुलै 27, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

बॉलीवूड अभिनेत्याच्या सुरक्षा वाहनाचा भीषण अपघात; अपघातादरम्यान २ जण जखमी, नेमकं काय घडलं?

Majja Webdeskby Majja Webdesk
जानेवारी 20, 2026 | 10:51 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Akshay Kumar Car Accident

बॉलीवूड अभिनेत्याच्या सुरक्षा वाहनाचा भीषण अपघात; अपघातादरम्यान २ जण जखमी

Akshay Kumar Car Accident: सिनेविश्वातून एक धक्कादायक बातमी समोर अली आहे. बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार याच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. २० जानेवारी रोजी रात्री अभिनेता अक्षय कुमार शूटिंग संपवून घरी परतत असताना हा अपघात घडला. विमानतळावरून जुहू येथील आपल्या घरी जात असताना एका भरधाव वेगाने येणाऱ्या मर्सिडीजने एका रिक्षाला धडक दिली, ज्यामुळे ती रिक्षा अक्षय कुमारच्या सिक्योरिटी व्हॅनला येऊन धडकली. अपघातात जखमी झालेल्या रिक्षा चालकाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आणखी वाचा: प्रसिद्ध गायिकेने घेतला कामातून आणि नातेसंबंधातून ब्रेक; ‘ती’ पोस्ट व्हायरल, म्हणाली, “मी परत येईन की नाही…”

जुहूच्या सिल्व्हर बीच कॅफेजवळ हे एकापाठोपाठ एक भयंकर अपघात झाले. या भीषण अपघातात सुदैवाने कोणीही मृत्युमुखी पडले नाही. चालक आणि प्रवासी सुरक्षा वाहनाखाली काही वेळासाठी अडकले होते,मात्र त्यातूनही त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. परिसरातील लोकांनी अक्षय कुमार आणि त्याच्या सुरक्षारक्षकांना कारमधून बाहेर येत गाडी खाली अडकलेल्या इतर नागरिकांना मदत करताना पाहिले. मिळालेल्या माहितीनुसार अपघातच्या घटनास्थळी हजर असलेल्या लोकांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की वाहने थांबल्यामुळे गोंधळ उडाला आणि रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अक्षय आणि त्याची टीम रिक्षा उचलताना आणि ड्रायव्हर आणि प्रवाशाला सुरक्षितपणे बाहेर काढताना दिसली. तर सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अक्षय कुमारच्या सिक्योरिटी व्हॅनचा अपघात झाला आहे असं सांगण्यात येत आहे. हा अपघात किरकोळ होता आणि कारमध्ये बसलेले सर्वजण सुरक्षित आहेत, त्यांना गंभीर दुखापत झालेली नाही. (Akshay Kumar Car Accident)

तर या बातमीमुळे अक्षय कुमारचे चाहते चिंतेत आहेत. अपघाताचा एक व्हिडिओ ऑनलाइन व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये गाडी उलटली झाल्याचे दिसून येत आहे आणि जवळून जाणारे लोक आत अडकलेल्यांना वाचवण्यासाठी धावपळ करत आहेत. अपघातानंतर मुंबई पोलीस लगेचच घटनास्थळी पोहोचले, त्यांनी परिस्थितीची जबाबदारी घेतली आणि तातडीने सर्व नियंत्रणात आणले. अक्षय कुमारने अद्याप अपघातावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. (Akshay Kumar Car Accident)

आणखी वाचा: “कोणाच्या भावना दुखावण्याचा माझा हेतू…”, वादग्रस्त विधानानंतर एआर रेहमानच स्पष्टीकरण, ट्रोल होताच बॉलिवूड मदतीला धावलं

Tags: Accident Newsakshay kumarAkshay Kumar Car Accidentbollywood actor
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Pach Futacha Bachchan Marathi Movie
Entertainment

‘पाच फुटाचा बच्चन’ चा दैदीप्यमान प्रवास : कीर्तन, संस्कृती आणि संघर्षाची प्रेरणादायी कथा

जुलै 25, 2026 | 2:00 pm
Shekhar Suman On Student Protest
Entertainment

तीन दिवस झोप नाही, रडत आहे आणि…; आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जमुळे प्रसिद्ध अभिनेत्याला दुःख, म्हणाला…

जुलै 25, 2026 | 12:45 pm
Eva grover husband hyder ali khan
Entertainment

दिग्दर्शकासह शरीरसंबंध ठेवण्यास जबरदस्ती आणि…; नवऱ्याबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “पैशांसाठी…”

जुलै 25, 2026 | 11:00 am
Akanksha Chamola Gaurav Khanna Lock Upp 2
Entertainment

Lock Upp 2 : गौरव खन्नाची कुत्र्याशी तुलना करणं पत्नीला पडलं भारी, नेटकरी भडकले, म्हणाले, “घटस्फोट दे…”

जुलै 25, 2026 | 9:50 am
Next Post
Bigg Boss Marathi Season 6

दिव्या बनली नवी कॅप्टन?, 'बिग बॉस'ने पूर्ण गेम पलटवला; घरातील सदस्य दिव्याच्या विरोधात, म्हणाले, "कॅप्टन्सी पदासाठी दिव्या अनुभवी नाही"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.