Kamali Promo Update : ‘कमळी’ या लोकप्रिय मालिकेत सध्या प्रेक्षकांना जबरदस्त ड्रामा पाहायला मिळत आहे. कथानक एका महत्त्वाच्या वळणावर आलं आहे, अनिका, कामिनी आणि रागिणी या तिघी मिळून कमळीविरोधात मोठा कट रचताना दिसत आहेत. मालिकेत अनिका सध्या चांगुलपणाचं नाटक करत असली, तरी तिच्या मनात कमळीबद्दल प्रचंड राग आहे. अनिकामुळेच कमळीला अन्नपूर्णा महाविद्यालयातून बाहेर काढते. या कठीण काळात हृषीने कमळीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे. मात्र, हृषी कमळीला मदत करत असल्याचं पाहून अनिका अधिकच चिडते.
दरम्यान, कमळी महाजन कुटुंबातील अन्नपूर्णा आजींची मोठी नात असल्याचं सांगत घरात राहतेय, असा संशय अनिकाला आधीपासूनच असतो. त्यामुळेच ती कामिनी आणि रागिणीसोबत मिळून हा मोठा उलगडा करण्याचा निर्णय घेते. खरं तर, कमळी ही अन्नपूर्णा आजींचीच मोठी नात आहे. पण तिची आई सरोज हिने काही कारणांमुळे हे सत्य सर्वांपासून लपवून ठेवलं आहे. याच गोष्टीचा आता कमळीला मोठा फटका बसताना दिसतोय.
आणखी वाचा – सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने घेतली नवी गाडी, फोटो शेअर करत म्हणाला, “पहिली कार…”
अनिका, कामिनी आणि रागिणी मिळून अन्नपूर्णा आजींसमोर कमळीच्या ओळखीचा भांडाफोड करतात. त्याचवेळी राजनदेखील आपली चूक मान्य करतो. या सगळ्या घडामोडींमुळे अन्नपूर्णा आजी थेट कमळीला प्रश्न विचारतात “तू खरंच माझी नात आहेस का?” कमळी ‘नाही’ असं उत्तर देते आणि त्या क्षणी अन्नपूर्णा आजींचा संताप अनावर होतो. त्या रागाच्या भरात कमळीला कानाखाली मारतात. एवढंच नाही, तर अनिका कमळीला घराबाहेर काढतानाही दिसते. हा सीन पाहून मालिकेतील हा सर्वात मोठा ट्विस्ट ठरणार असल्याचं स्पष्ट होतं.
आणखी वाचा – १० वर्षांनंतर मालिकेत कमबॅक केलं, मराठमोळ्या अभिनेत्रीची मालिका तीन महिन्यातच बंद?





