रंग, रूप, वय, जातपात, धर्म या सर्व गोष्टी बाजूला ठेवून मिळत्या त्या विषयाला आपलंस करून अभिनय करणारा कलाकार या प्रेक्षकांच्या आजन्म लक्षात राहतो. हिंदी, मराठी चित्रपट सृष्टीत काम करणाऱ्या कलाकारांच्या यादीत असे अनेक कलाकार आपल्याला आपल्या आसपास पाहायला मिळतात. एवढच काय तर कथे नुसार लागणारे इतर भाषिक किंवा रंग रूपाचे कलाकार जे ज्या ज्या देशातून बोलावले जातात.
जुन्या चित्रपटांमध्ये फॉरेनर लोंकाना पाहणं हे एक प्रकारचं कुतुहूल असत. नाना पाटेकर यांच्या तिरंगा चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारणाऱ्या कलाकराच्या टोळीत सामील असलेला अभिनेता बॉब क्रिस्टो, अभिनेता गेविन पैकार्ड, अभिनेता टॉम अल्टर हे अभिनेते दिसताना जरी फॉरेनर असले तरी ते भारतीय वंशाचे आहेत. (Famous Foreigner Villains in Bollywood)
१) टॉम अल्टर
फॉरेनर दिसणाऱ्या भारतीय टॉम अल्टर यांनी फक्त व्हिलनची भूमिका न करता काही सकारात्मक भूमिका देखील केल्या आहेत. एवढच काय तर मराठी मध्ये टॉम ने काम केलं आहे. दप्तर नावाच्या एका मराठी चित्रपटात एक सकारात्मक भूमिका टॉम ने साकारली होती. मृग त्रिष्ण हा टॉमचा पहिला चित्रपट होता.
‘लैला मजनू’, ‘हम किसीसे कम नहीं’, ‘चरस’, ‘काला पाणी’, ‘वीर झारा’, ‘वीर सावरकर’ अशा अनेक हिंदी चित्रपटमध्ये टॉम ने महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

२)गेविन पैकार्ड
बॉलीवूडच्या बहुतांश चित्रपटांमध्ये व्हीलन च्या पार्टी कडून शार्प शूटर म्हणून पुढे येणार नाव होत ते गेविनचच. घारे डोळे, लांब केस, गोरा चेहरा असं रूप असणारा व्हिलन कधी कधी चित्रपटाच्या हिरो पेक्षाही जास्त आवडीचा ठरू शकतो हे गेविनला पाहून वाटत असावं. संजय दत्त, मिथुन चक्रवर्ती यांच्या बहुतके जुन्या चित्रपटांमध्ये गेविनहा हमखास दिसयचा.
‘शेर ये हिंदुस्थान’, ‘जुर्म’, ‘फतेह’, ‘जुर्माना’, ‘एक था राजा’, ‘मुक्कदर’, ‘जल्लाद’, ‘ये है जलवा’, ‘वक्त है हमारा’, ‘गद्दार’, ‘चिताहह’ , ‘यशवंत’, ‘मोहरा’, ‘जागृती’, ‘मा कसम’, ‘अंगारा’, ‘हम है बेमिसाल’ अशा अनेक चित्रपटांमध्ये गेविनने व्हिलनच काम केलं आहे. (Famous Foreigner Villains in Bollywood)

३)बॉब क्रिस्टो
ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे जन्म झालेल्या बॉब क्रिस्टोयाच खरं नाव जॉन क्रिस्टो होते. एका मॅगझीन वर पाहिलेल्या भारतीय अभिनेत्रीला शोधण्यासाठी तो भारतात आला होता असे सांगितले जाते. या अभिनेत्रींचे नाव होते परवीन बाबी. परवीन शी भेट झालाय नंतर दोघांमध्ये चॅन मैत्री झाली आणि या मैत्रीतूनच पुढे बॉबला बॉलीवूड मध्ये एन्ट्री मिळाली. चोरी, छेड काढणे, या गोष्टींपासून ते अगदी प्रोफेशनल स्मगलर यांच्या दिसणारा बॉब व्हिलनच्या भूमिकांसाठी चंगळच नावाजला जाऊ लागला. (Famous Foreigner Villains in Bollywood)

बॉब क्रिस्टो यांनी बॉलिवूडच्या बऱ्याच सिनेमामध्ये काम केल. त्यांनी ‘कालिया’, ‘नमक हलाल’, ‘डिस्को डांसर’, ‘नोकर बीवी का’, ‘नास्तिक मैं इंतेक़ाम लूंगा’,’कसम पैदा करने वाले की’, ‘हम से है ज़माना’, ‘शराबी’, ‘राज तिलक’,’हुकूमत’, ‘वर्दी’, ‘मर्द’, ‘इंसाफ़ मैं करूंगा’, ‘मिस्टर इंडिया’, ‘तूफ़ान’, ‘तिरंगा’, ‘अग्निपथ’,’रूप की रानी चोरों का राजा’ , ‘गुमराह’ सारख्या साधारण दोनशे सिनेमात विविध भूमिका केल्या. त्यांच्या या भूमिकांची चांगलीच चर्चा होती