शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

एनडी स्टुडिओमध्येच बांधलेल्या घरामध्ये मुक्काम, कर्मचाऱ्यांशी संवाद अन्…; नितीन देसाईंच्या आत्महत्येपूर्वी नेमकं काय घडलं?

काजल डांगेby काजल डांगे
ऑगस्ट 2, 2023 | 2:57 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Nitin Chandrakant Desai Suicide in Karjat Studio

Famous art director nitin desai suicide know about exactly what happen before his death see details

सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी एनडी स्टुडिओ येथे गळफास घेत आत्महत्या केली. ते ५७ वर्षांचे होते. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे. तसेच त्यांच्या कुटुंबीयांवरही दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अनेक कलाकार मंडळी नितीन देसाईंच्या निधनानंतर दुःख व्यक्त करताना दिसत आहेत. तर काहींनी त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. नितीन देसाई यांनी एवढं मोठं टोकाचं पाऊल का उचललं?, आत्महत्येमागचं नेमकं कारण काय? हे अद्यापही अस्पष्टच आहे. पण नितीन देसाई यांच्या आत्महत्येपूर्वी नेमकं काय घडलं? हे आपण जाणून घेणार आहोत.

नितीन देसाई यांच्या निधनाची बातमी ऐकताच त्यांच्या कुटुंबीयांसह कलाकार मंडळींना दुःखद धक्का बसला. आम्ही जवळचा मित्र गमावला, चित्रपटसृष्टीचं मोठं नुकसान झालं अशा भावना कलाकारांनी व्यक्त केल्या आहेत. पण आत्महत्येपूर्वी ते नेमके कुठे होते?, तेव्हा नेमकं काय घडलं? हे समोर आलं आहे. नितीन देसाईंनी एनडी स्टुडिओ उभारण्याचं स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न पूर्णही केलं.

आणखी वाचा – “त्याच्याशी बोलायला हवं होतं”, नितीन देसाईंच्या निधनानंतर महेश मांजरेकर भावुक, म्हणाले, “त्याला मी शेवटचं पाहिलं तेव्हा…”

एनडी स्टुडिओमध्येच त्यांनी स्वतःसाठी छोटं घर बांधलं होतं. गेल्या दोन दिवसांपासून ते याच घरामध्ये राहत होते. एनडी स्टुडिओ म्हणजे त्यांचं दुसरं घर होतं. आत्महत्येच्या दोन दिवसांपासून ते एनडी स्टुडिओमध्ये बांधलेल्या घरामध्येच राहत होते. ३१ जुलैपर्यंत (सोमवार) त्यांनी आपल्या संपूर्ण टीमला त्यांच्या पुढील प्रोजेक्टबाबत माहिती दिली होती. मात्र आज सकाळपासून त्यांनी एकाही व्यक्तीच्या फोनला प्रतिसाद दिला नाही.

आणखी वाचा – Nitin Desai Suicide : नितीन देसाईंच्या आत्महत्येनंतर मनसे नेते व दिग्दर्शक अभिजित पानसेंची प्रतिक्रिया, म्हणाले, “आमचं भेटायचं ठरलं होतं अन्…”

View this post on Instagram

A post shared by Nitin Chandrakant Desai (@nitinchandrakantdesai)

दरम्यान नितीन देसाई यांचा प्रतिसाद न मिळाल्याने कर्मचाऱ्यांनी एनडी स्टुडिओच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. अधिकाऱ्यांनी नितीन देसाई राहत असलेल्या घराचा दरवाजा तोडला. शिवाय लगेचच त्यांनी या संपूर्ण प्रकाराबाबत पोलिसांना माहिती दिली. आर्थिक अडचणींमुळे नितीन देसाई यांनी हे टोकाचं पाऊल उचललं असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. मात्र अद्यापही पोलिसांचा तपास सुरु आहे. नितीन देसाई पूर्वी मुलुंड येथे राहत होते. कालांतराने ते पवई येथे स्थायिक झाले. मात्र आता त्यांचं पार्थिव मुलुंड येथील रुग्णालयात ठेवण्यात आलं आहे. २ ऑगस्ट (गुरुवार) रोजी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

Tags: nitin desainitin desai suicidenitin desai suicide marathi news
काजल डांगे

काजल डांगे

काजल डांगे या 'इट्स मज्जा' वेबसाईटच्या सीनिअर एडिटर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. महर्षी दयानंद महाविद्यालयामधून त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (बीएमएम) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना साम टीव्ही, प्रहार वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. त्यानंतर त्यांनी ‘न्यूज १८ लोकमत’ या वृत्तवाहिनीपासून पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त वाहिनीमध्ये दोन वर्षांचा अनुभव. त्यानंतर त्यांनी ‘सकाळ’ वृत्तपत्रामध्ये दोन वर्ष सब एडिटर म्हणून जबाबदारी हाताळली. शिवाय ‘सकाळ’ वृत्तपत्राच्या प्रीमियर या मासिकाच्याही त्या सब एडिटर होत्या. 'लोकसत्ता' ऑनलाईनमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून त्या दीड वर्ष कार्यरत होत्या. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Kadambari Mali Interview
Entertainment

“१६ वर्षाचीच मुलगी Lead हवी”, लीडच्या भूमिका न मिळण्यावर मराठी अभिनेत्रीच भाष्य, म्हणाली, “फुकट काम…”

एप्रिल 18, 2026 | 11:00 am
Humidity Infections Summer health issues
Lifestyle

आजकाल तुम्हालाही ताप आणि पोटदुखीचा त्रास होतोय का?, असे होण्यामागचं कारण आहे…

एप्रिल 18, 2026 | 9:50 am
patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Next Post
Nitin Desai At Lalbaughcha Raja

Nitin Desai Suicide : लालबागच्या राजाच्या मंडप सजावटीचं काम करणार होते नितीन देसाई, दोन दिवसांपूर्वी लालबागमध्येही पोहोचले होते अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.