शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

भुस्खलनामुळे बद्रीनाथमध्ये अडकली सुप्रसिद्ध अभिनेत्री, खाण्या-पिण्याचे होत आहेत हाल, म्हणाली, “भीषण परिस्थिती…”

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 14, 2024 | 1:07 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Famous actress Kavita Kaushik stuck for the past four days due to landslides in Badrinath along with her husband.

भुस्खलनामुळे बद्रीनाथमध्ये अडकली सुप्रसिद्ध अभिनेत्री, खाण्या-पिण्याचे होत आहेत हाल, म्हणाली, “भीषण परिस्थिती…”

गेले काही दिवस सर्वत्र पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. मुंबई, महाराष्ट्रासह उतार अनेक ठिकाणी पावसाने हाहाकर माजवला आहे. अशातच जोशीमठ-बद्रीनाथ महामार्गावर दरड कोसळल्याने टीव्ही अभिनेत्री कविता कौशिक अडकली आहे. गेल्या काही दिवसांपासून उत्तराखंडमधील जोशीमठमध्ये अभिनेत्री अडकली आहे. वृत्तानुसार, ती तिचा पती रोनित बिस्वास आणि त्यांच्या पाळीव कुत्र्यासह तेथे बांधलेल्या आर्मी कॅम्पमध्ये राहत आहे. ही अभिनेत्री बद्रीनाथ या पवित्र तीर्थक्षेत्राच्या दर्शनासाठी गेली होती आणि परतत असताना रस्त्यात दरड कोसळल्यामुळे अभिनेत्री अडकली आहे. ५ जुलै रोजी तिच्या पतीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ती बद्रीनाथला गेली. तिच्याबरोबर तिचा नवरा, तिचा पाळीव कुत्रा आणि चुलत भाऊही होता.

‘ईटाईम्स’शी बोलताना अभिनेत्रीने सांगितले की, “चार दिवस तिथे अडकल्यामुळे मला अस्वस्थ वाटत आहे. मला काशीपूरमध्ये एका महत्त्वाच्या कार्यक्रमाला जायचे आहे. मला आशा आहे की, आम्ही लवकरच बाहेर पडू कारण मला माझ्या वचनबद्धतेचे उल्लंघन करणे आवडत नाही”. पुढे तेथील सद्यस्थितीबद्दल बोलताना कविता कौशिक म्हणाली की, “महामार्गावर हजाराहून अधिक गाड्या अडकल्या आहेत. रस्ते मोकळे करण्यासाठी पोलीस, लष्कर आणि सीमा रस्ता संघटना सातत्याने काम करत आहेत. तथापि, प्रत्येक वेळी त्यांनी भूस्खलन साफ ​​केल्यावर दुसरे भूस्खलन होते. भीषण परिस्थिती असूनही, ते सर्व पर्यटक सुरक्षित आहेत आणि त्यांना कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी घेत आहेत”.

View this post on Instagram

A post shared by Kavita Kaushik (@ikavitakaushik)

आणखी वाचा – भरत जाधव यांच्याकडून ओंकार भोजनेचं तोंडभरुन कौतुक, स्वत:कडची ‘ती’ अमूल्य भेटवस्तूही दिली अन्…; म्हणाले, “तू वरचा क्लास…”

यापुढे तिने असं म्हटलं की, “रेस्टॉरंट आणि हॉटेलवले वॉशरूमला जाण्यासाठी २०० रुपये घेत आहेत. आर्मीच्या लोकांना याबद्दल माहीत झाले तेव्हा त्यांनी हॉटेलवाल्यांना पर्यटकांची मदत करण्यास सांगितले. इथे अनेक गाड्या थांबल्या आहेत, त्यामुळे आता इथे नक्की किती जण अडकले असतील याची कल्पना करु शकत नाही”.

आणखी वाचा – अनंत-राधिकाच्या लग्नात अभिषेकऐवजी सलमानबरोबर दिसली ऐश्वर्या, ‘त्या’ व्हायरल फोटोमुळे चर्चांना उधाण, नेमकं सत्य काय?

दरम्यान, ‘एफआयआर’मधील चंद्रमुखी चौटेलाच्या पात्राने कविता कौशिक घराघरांत लोकप्रिय झाली. याशिवाय तिने ‘वो तेरा छलावा’, ‘कुटुंब’ आणि ‘कहानी घर घर की’ यांसारख्या अनेक टीव्ही मालिकांमधून काम केले आहेत. तिने ‘नच बलिए ३’, ‘बिग बॉस १४’ आणि इतर रिॲलिटी शोमध्येही भाग घेतला आहे.  

Tags: entertainment newsKavita KaushikKavita Kaushik stucked In Badrinath
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Anant Ambani gifted watches worth 2 to 3 crores to his wedding guests shahrukh khan and ramveer singh.

अंबानींचा नादच नाय! लग्नात आलेल्या पाहुण्यांना दिल्या महागड्या भेटवस्तू, किंमती ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.