शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : “‘बिग बॉस’चे विजेते आधीच ठरलेले असतात”, शोची विजेती शिल्पा शिंदेचं मोठं वक्तव्य, म्हणाली, “मूर्ख…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 13, 2025 | 11:00 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
 Shilpa Shinde Video  On Bigg Boss Winner

"'बिग बॉस'चे विजेते आधीच ठरलेले असतात", शोची विजेती शिल्पा शिंदेचं मोठं वक्तव्य, म्हणाली, "मूर्ख…"

 Shilpa Shinde Video  On Bigg Boss Winner : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री शिल्पा शिंदे तिच्या ‘भाभीजी घर पर हैं’ या मालिकेतील अंगुरी भाभीच्या भूमिकेमुळे घराघरात पोहोचली. ‘बिग बॉस ११’ची विजेती अभिनेत्री शिल्पा शिंदे काही ना काही कारणास्तव चर्चेत असते. बऱ्याचदा वेगवेगळ्या वादामध्ये शिल्पा अडकते. ‘बिग बॉस १८’ हा वादग्रस्त टीव्ही शो सतत चर्चेत असतो. आता हा शो हळुहळू अंतिम फेरीकडे वाटचाल करत आहे. दरम्यान, टीव्ही अभिनेत्री आणि ‘बिग बॉस सीझन ११’ ची विजेती शिल्पा शिंदेचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिने शोच्या निर्मात्यांवर प्रेक्षकांना मूर्ख बनवल्याचा आरोप केला आहे. शिल्पाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये शिल्पा शिंदे असं म्हणताना दिसत आहे की, “मला माहित नाही, पण काही लोकांना कळले आहे की, निर्माते विजेते ठरवतात. ते स्वत: विजेत्याची निवड करतात, त्यांच्या घरातून उचलतात आणि विजेते दाखवतात. आता चॅनलची जी काही रणनीती आहे, ती लोकांनाही कळली आहे, त्यामुळेच लोक हा शो जास्त बघत नाहीत, कारण तुम्ही एखाद्याला काही प्रमाणात मूर्ख बनवू शकता”. शिल्पाच्या व्हिडीओवर नेटकरीही जोरदार कमेंट करत आहेत.

आणखी वाचा – “वालावलकरांची पोरगी पटवली…”, अंकिता वालावलकरसाठी नवऱ्याचा हटके उखाणा, केळवण स्पेशल व्हिडीओ समोर

View this post on Instagram

A post shared by Kashish Kapoor Fanpage 🧿 (@kashishkapoorfb)

शिल्पाच्या या व्हिडीओवर नेटकरी भरभरुन कमेंट करत अभिनेत्रीच्या वक्तव्याला पाठिंबा देताना दिसत आहेत. शिल्पाने केलेलं हे वक्तव्य अनेकांना पटलं असून अनेकांनी याबाबतही आपलं मत मांडलं आहे. ‘बिग बॉस’च्या रणनितीबाबत शिल्पाचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. यावर एका नेटकऱ्याने कमेंट करत, “हे खरे आहे”, असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने लिहिले आहे की, “याचा अर्थ असा आहे की निर्मात्यांनी तुम्हाला विजेते बनवले आहे, तुम्ही तितके पात्र नव्हता”. तर आणखी एकाने लिहिले आहे की, “हो, कारण हिनाने शो जिंकला”.

आणखी वाचा – ब्रेन स्ट्रोक आल्यानंतर टिकू तलसानियांची तब्येत कशी? लेकीने दिली मोठी माहिती, म्हणाली, “माझे पप्पा…”

‘बिग बॉस सीझन ११’ मध्ये शिल्पा शिंदे आणि हिना खान यांच्यात चुरशीची स्पर्धा होती, पण शिल्पा शिंदेने ट्रॉफी जिंकली. मात्र, त्यावेळी सोशल मीडियावर अनेकांचा असा विश्वास होता की हिना खान ट्रॉफी जिंकण्यासाठी पात्र आहे. ‘बिग बॉस सीझन १८’ चा ग्रँड फिनाले १९ जानेवारीला होणार आहे.

Tags: bigg boss winnershilpa shindeShilpa Shinde Video  On Bigg Boss Winner
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Next Post
Kiran Rao On Divorce

"घटस्फोट घेणं कठीण नव्हतं", आमिर खानची पूर्वाश्रमीची पत्नी किरण रावचं भाष्य, म्हणाली, "त्याची आई व मुलं…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.