शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

TRP चा फटका! ‘स्टार प्रवाह’ची ‘ही’ मालिका अवघ्या दोन महिन्यांत संपणार; अंतिम भागाची तारीख जाहीर, प्रेक्षक नाराज

Majja Webdeskby Majja Webdesk
जानेवारी 8, 2026 | 1:07 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Star Pravah New Update

'ही' मालिका अवघ्या दोन महिन्यांत संपणार

Star Pravah New Update : मराठी मालिकाविश्वात सध्या टीआरपीसाठी तीव्र स्पर्धा सुरू आहे. अनेक नव्या मालिकांना अपेक्षित प्रतिसाद मिळणं कठीण ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील थ्रिलर मालिका ‘काजळमाया’ संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण करणारी ही मालिका अवघ्या दोन महिन्यांतच निरोप घेणार आहे. २७ ऑक्टोबर २०२५ रोजी सुरू झालेल्या ‘काजळमाया’मध्ये अभिनेता अक्षय केळकर, रुची जाईल आणि वैष्णवी कल्याणकर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. सुरुवातीला रात्री साडे दहाच्या वेळेत सुरू झालेल्या या मालिकेची वेळ टीआरपी अभावी बदलून रात्री अकराची करण्यात आली. मात्र वेळ बदलूनही अपेक्षित प्रेक्षक संख्या मिळू न शकल्याने अखेर वाहिनीने मालिकेला ऑफ एअर करण्याचा निर्णय घेतल्याचं स्पष्ट झालं आहे.

‘स्टार प्रवाह’ने अधिकृतपणे जाहीर केल्याप्रमाणे ११ जानेवारी रोजी ‘काजळमाया’चा अंतिम भाग प्रसारित होणार आहे. या मालिकेत चेटकीण वंशातील ‘पर्णिका’ या रहस्यमय असलेल्या पात्राची कथा मांडण्यात आली होती. अंतिम भागाच्या प्रोमोमध्ये पर्णिका आणि कनकदत्ताचा कायमचा अंत दाखवण्यात येणार असल्याची झलक शेअर करण्यात आली आहे. यामुळे मालिकेचा शेवट निर्णायक आणि थरारक असणार असल्याचं संकेत मिळत आहेत.

आणखी वाचा – ‘बालिका वधू’ फेम अभिनेत्री प्रेग्नेंट?; लवकरच आनंदाची बातमी देणार, ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

मालिका इतक्या कमी कालावधीत संपणार असल्याची बातमी समोर येताच सोशल मीडियावर प्रेक्षकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. “आता कुठे कथा रंगात आली होती”, “ही मालिका इतकी लवकर का बंद केली?”, “कधी सुरू झाली कधी संपली कळलंच नाही”. ‘काजळमाया’ने अचानक घेतलेला निरोप हा प्रेक्षकांसाठी अनपेक्षित ठरला आहे.

आणखी वाचा – विकी-कतरिनाने जाहीर केलं लेकाचं नाव; वडिलांच्या ‘या’ चित्रपटाशी खास कनेक्शन, फोटो समोर

Tags: kajalmaya off airmarathi serialStar Pravah New Update
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Prasad Jawade Shares Emotional Post After Mother Demise

"आई तुझी खूप आठवण…" आईच्या निधनानंतर 'पारू' फेम अभिनेत्याची भावुक पोस्ट, म्हणाला, "हसऱ्या चेहऱ्याने जगणारी"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.