शुक्रवार, मे 23, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘चला हवा येऊ द्या’ मधून बाहेर पडल्यानंतर ‘कलर्स मराठी’वर निलेश साबळेचा नवा शो, ओंकार भोजनेसह ‘या’ सुप्रसिद्ध कलाकारांची दमदार एंट्री

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 3, 2024 | 10:07 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Dr. Nilesh Sable New Show

'चला हवा येऊ द्या' मधून बाहेर पडल्यानंतर 'कलर्स मराठी'वर निलेश साबळेचा नवा शो, ओंकार भोजनेसह 'या' सुप्रसिद्ध कलाकारांची दमदार एंट्री

आजवर झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. जवळपास दहा वर्ष हा कार्यक्रम प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत होता. या कार्यक्रमाची रूपरेषा डॉ. निलेश साबळे याने सांभाळली. प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर आता या कार्यक्रमाने निरोप घेतला. त्यामुळे “मंडळी हसताय ना, हसायलाच पाहिजे”, हा निलेश साबळेंचा आवाज सारेच प्रेक्षक मिस करत होते. प्रेक्षकांना आता हा आवाज पुन्हा ऐकायला मिळणार आहे, याची नोंद निलेश साबळेंनी घेतली आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. (Dr. Nilesh Sable New Show)

डॉ. निलेश साबळे यांच्या नव्या कार्यक्रमाची घोषणा झाली असून हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या लाडक्या कलर्स मराठी वाहिनीवर येण्यास सज्ज होत आहे. कलर्स मराठी नव्या वर्षात नवी उर्जा आणि नवी झळाळी घेऊन आपल्या प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा धमाकेदार खजिना घेऊन येत आहे. ‘इंद्रायणी’, ‘सुख कळले’ या मालिकांनंतर कलर्स मराठी आता विनोदाचा ॲटमबॅाम्ब फोडायला सज्ज झाली आहे. महाराष्ट्राचा अत्यंत लाडका विनोदाचा बादशाह अर्थात डॅा. निलेश साबळे याच्याबरोबर विनोदाची ही सुपरफास्ट मेल आता कलर्स मराठी घेऊन येत आहे.

आणखी वाचा – Video : गोव्यामध्ये असणाऱ्या ‘त्या’ गावातील तलावाजवळ टाळ्या वाजवल्या की पाण्यातून येतात बुडबुडे, दैवी चमत्कार की आणखी काय?

View this post on Instagram

A post shared by @colorsmarathi

डॉ. निलेश साबळेबरोबरच भाऊ कदम आणि ओंकार भोजने हे विनोदसम्राट या कार्यक्रमात सहभागी असणार असून या कार्यक्रमाचे नाव “हसताय ना ?हसायलाच पाहिजे!!”, असे ठेवण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे लेखन, दिग्दर्शन, सूत्रसंचालन अशी तिहेरी धुरा डॉ. निलेश साबळे स्वतः सांभाळणार असून यात भाऊ कदम, ओंकार भोजनेबरोबरच सुपर्णा श्याम , स्नेहल शिदम आणि रोहित चव्हाण आदि कलाकार त्यांना साथ देणार आहेत. तर या कार्यक्रमात महाराष्ट्राचे कॅामेडी किंग आणि अत्यंत संवेदनशील गुणी अभिनेते भरत जाधव आणि चार दशकं सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या अलका कुबल आठल्ये हे दोन महान कलाकार दर भागामधे सेलिब्रिटी पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला दाद देण्यासाठी लाभणार आहेत. त्यामुळे विनोदाचा हा पॅावरबाज डोस घेण्यासाठी सज्ज रहा.

आणखी वाचा – “आम्ही शेतकऱ्यांकडून घेऊ…”, प्रथमेश लघाटे आंब्याच्या व्यवसायावरुन ट्रोल, नेटकऱ्याला सणसणीत उत्तर देत सुनावलं, म्हणाला, “स्वतःला ग्रेट म्हणण्यापेक्षा…”

डॉ. निलेश साबळे यांनी आपल्या बहारदार विनोदाने अवघ्या महाराष्ट्राला हसवले. केवळ महाराष्ट्रातच नाही तर जगभरात त्यांनी त्यांचे चाहते निर्माण केले. भाऊ कदम यांनीही आपल्या मिश्किल चेहऱ्याने आणि निखळ विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना आपलेसे केले. तसेच ओंकार भोजनेही आपल्या खास शैलीमुळे प्रेक्षकांचा लाडका झाला. आता विनोदाचे हे तीन हुकमी एक्के एकत्र येऊन पुन्हा एकदा नव्या जोशात , नव्या जल्लोषात विनोदाची चौफेर आतषबाजी करायला सज्ज झाले आहेत. ”हसताय ना ? हसायलाच पाहिजे!!’ हा शो कलर्स मराठीवर २० एप्रिलपासून शनिवार आणि रविवार रात्री नऊ वाजता पाहायला मिळणार आहे.

Tags: bhau kadamDr. Nilesh Sable New Shownilesh sable comedy showonkar bhojane
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Vaishnavi Hagawane Death Case
Entertainment

“हुंड्याच्या पैशांतून उभारलेली घरंदारं…”, वैष्णवी हगवणे प्रकरणी मराठी अभिनेत्याचं स्पष्ट मत, म्हणाले, “असा छळ…”

मे 23, 2025 | 12:51 pm
Vaishnavi Hagawane Death Case
Entertainment

“प्रकरण दाबलं तर पुन्हा पैसा व पद…”, वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं बेधडक वक्तव्य, म्हणाली, “आरोपींना…”

मे 23, 2025 | 12:35 pm
Armaan Malik Wife Pregnancy
Entertainment

पाचव्यांदा बाबा होणार अरमान मलिक?, दुसरी पत्नी पुन्हा गरोदर?, व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

मे 23, 2025 | 11:39 am
Vaishnavi Hagawane Death Case
Entertainment

“एका मुलीचा बाप म्हणून…”, वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावर मराठी अभिनेत्याचा संताप, म्हणाला, “गप्प बसून…”

मे 23, 2025 | 11:03 am
Next Post
Divyanka tripathi surgery

‘ये है मोहोब्बते’मधील सुप्रसिद्ध अभिनेत्रीवर शस्त्रक्रिया, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “माझा नवरा...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.