सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“हद्द पार करू नको” भाऊच्या धक्क्यावर रितेशने केली प्रभू शेळकेची कानउघडणी, म्हणाला, “जास्त लाडात येऊ नको…”

Majja Webdeskby Majja Webdesk
जानेवारी 31, 2026 | 3:11 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 6

रितेशने केली प्रभू शेळकेची कानउघडणी

Bigg Boss Marathi 6 : ‘बिग बॉस’ मराठी’च्या सहाव्या सीझनमध्ये घरातील वातावरण दिवसेंदिवस अधिकच तणावपूर्ण होत चाललं आहे. टास्क, नियम आणि शिस्त यावरून घरात वारंवार वाद होताना दिसत आहेत. या सीझनमध्ये प्रत्येक टास्कनंतर सदस्यांना गोल्डन, सिल्व्हर किंवा ब्राँझ रेशन कार्ड मिळत आहे. गोल्डन रेशन कार्ड मिळालेल्या सदस्यांना घरातील सर्व सुविधा, आरामदायक बेड, पुरेसं रेशन आणि स्वतंत्र वॉशरूमचा वापर करता येतो. सिल्व्हर कार्डधारकांना काही प्रमाणात सवलती मिळतात, मात्र अंडी, साखर यांसारख्या वस्तू वेळेवर मिळत नाहीत.

तर ब्राँझ रेशन कार्ड मिळालेल्या सदस्यांसाठी नियम अत्यंत कठोर आहेत. जमिनीवर झोपणं, मर्यादित रेशन, एकाच वॉशरूमचा वापर आणि अनेक बंधनं त्यांच्यावर लागू केली जातात. मात्र, याच आठवड्यात नॉमिनेशन टास्कमध्ये घरातील सदस्य एकमताने निर्णय घेऊ न शकल्याने ‘बिग बॉस’ने थेट संपूर्ण घरालाच ब्राँझ रेशन कार्ड लागू केलं. कॅप्टन आयुष वगळता सर्व सदस्यांना जमिनीवर झोपावं लागलं. तब्बल १६ सदस्यांसाठी एकच वॉशरूम उपलब्ध असल्याने घरात अस्वस्थता आणि चिडचिड वाढली.

आणखी वाचा – “लाडका भाऊ योजना…” भाऊच्या धक्क्यावर रितेशने दिव्या-राकेशला झापलं, म्हणाला, “स्वतःचा गेम…”

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

या सगळ्या परिस्थितीत छोटा डॉन म्हणून ओळखला जाणारा प्रभू शेळके अनेकदा नियम तोडताना दिसून आला. याची गंभीर दखल घेत ‘भाऊच्या धक्क्या’मध्ये रितेश देशमुख यांनी प्रभूला थेट जाब विचारला. प्रोमोमध्ये रितेश सर्वांसमोर स्पष्टपणे सांगतात की प्रभू आता २० वर्षांचा आहे आणि त्यानुसारच त्याच्याकडून वर्तनाची अपेक्षा आहे. रितेश म्हणतात, “तुम्ही स्वतः सांगितलं की तुम्ही २० वर्षांचे आहात. मग आता मी तुम्हाला तसंच वागवणार. दोन आठवडे तुमचं कौतुक केलं, तुमचे लाड झाले. पण आता तुम्ही उद्धटपणे वागताय, नियम मोडताय. आता बस!” रितेश यांच्या या कठोर शब्दांनी प्रभू पूर्णपणे गोंधळलेला दिसतो. आता या कानउघडणीनंतर प्रभू आपला स्वभाव आणि खेळ बदलणार का?, की त्याची ही भूमिका पुढील टास्कमध्ये त्याला अडचणीत आणणार?, हे पाहणं प्रेक्षकांसाठी नक्कीच रंजक ठरणार आहे.

आणखी वाचा – गरोदर सोनम कपूरचं वेस्टर्न बॉडीकॉन ड्रेसमध्ये खुललं सौंदर्य, बेबी बंपने वेधलं लक्ष, प्रेग्नंसी ग्लोमुळे आता अशी दिसते अभिनेत्री

Tags: Bigg Boss Marathi 6entertainmentmarathi entertainment news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
late night eating
Entertainment

रात्री नऊ नंतर जेवताय?, हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो मोठा परिणाम, वाचा सविस्तर

जून 6, 2026 | 12:08 pm
 Tea And Health
Entertainment

चहा पिण्याला कोणतं वय योग्य?, आजारी पडण्याआधी जाणून घ्या सविस्तर…

जून 5, 2026 | 12:10 pm
Next Post
Kangana Ranaut Period

“बेडशीट रक्ताने माखलेली, खूप रडले; 'त्या' प्रसंगाबाबत अभिनेत्री कंगना राणौतचा पहिल्यांदाच खुलासा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.