हिंदी मालिका विश्वातून एक दुःखद बातमी आज समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री अमनदीप हिने या जगाचा निरोप घेतला असून तिच्या निधनाच्या बातमीने मालिकाविश्वात शोककळा पसरली. या धक्क्यातून सावरत असतानाच अमनदीप हिच्या कुटुंबावर आणखी एक दुःखाचा डोंगर कोसळला. काही तासांपूर्वीच अमनदीपची बहिणी डोली सोहीचे देखील निधन झाल्याची बातमी सर्वत्र पसरली.(Dolly sohi Amandeep Death)
डॉक्टरांच्या रिपोर्ट्सनुसार काविळीच्या आजरामुळे अमनदीप तर गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे डोलीने या जगाचा निरोप घेतल्याचे स्प्ष्ट झाले असून अमनदीपचा भाऊ मन्नूने देखील मीडियाला याबाबत माहिती दिली आहे. डॉलीच्या मृत्यू नंतर तिची शेवटची इंस्टाग्राम पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. २० फेब्रुवारी रोजी डॉलीने शेवटची पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये ती म्हणालेली “प्रार्थना हा जगातील सर्वात मोठा चमत्कार आहे, मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे.”
डॉलीच्या पोस्टनंतर २२ फेब्रुवारी रोजी अमनदीपने देखील एक पोस्ट शेअर केली होती. अमनदीपने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये ती अत्यंत अशक्त दिसत होती. अमनदीप व डॉली या बहिणींवर मुंबईमधील एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. येथे अमनदीपवर काविळीचे उपचार सुरु होते. परंतु काविळीच्या वाढत्या प्रमाणामुळे अमनदीपची किडनी निकामी झाली आणि तिला या जगाचा निरोप घ्यावा लागला. तर दुसरीकडे डॉलीची किमियोथेरपी देखील याच हॉस्पिटलमध्ये सुरु होती. गेल्या काही दिवसांपासून गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाशी लढा देत होती. मात्र तिच्या या लढ्याला अपयश आले असून तिची या लढ्याची झुंज अखेर अपयशी ठरली. (Dolly sohi Amandeep Death)
आणखी वाचा- ‘बाईपण…’ नंतर ‘आईपण…’ ठरणार भारी! केदार शिंदे यांची मोठी घोषणा
अमनदीप सोही हीदेखील एक अभिनेत्री आहे. अमनदीप डॉलीइतकी लोकप्रिय नसली तरी, मनोरंजन उद्योगात अमनदीपचे स्वतःची वेगळी ओळख आहे. तिने अनेक टीव्ही मालिकांमध्ये अभिनय करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही बहिणींवर आज दुपारी नवी मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.