स्टार प्रवाह वाहिनीवर अनेक नवनवीन मालिका या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.पण काही मालिका आणि पात्र हे नेहमी चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. अशीच एक मालिका म्हणजे ठिपक्यांची रांगोळी. ही मालिका कमी वेळातच लोकप्रिय ठरली. या मालिकेतून एकत्र कुटुंबाचे महत्त्व अधोरेखित केले जात असून कानिटकर कुटुंबाची खास गोष्ट पाहायला मिळते. मालिकेत अप्पू आणि शशांक यांची एक भन्नाट केमिस्ट्री आणि त्यांची भांडण चाहत्यांच्या देखील पसंतीस उतरतात. अप्पू आणि शशांक हे पात्र मालिकेत चेतन वडनेरे आणि ज्ञानदा रामतीर्थकर साकारताना दिसतात. अप्पू म्हणजे ज्ञानदा ही ऑन स्किन प्रमाणे ऑफ स्किन देखील चर्चेत असते.(Dnyanada Ramtirthkar)
ज्ञानदाच्या बाबांनी केला तिच्या टोपण नावाचा खुलासा
ज्ञानदा ही सोशल मीडियावर फोटो व्हिडीओ शेअर करत सर्वांचं मनोरंजन करत असते. ती नेहमी वेगवेगळे गेम्स तसेच काही माहिती शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतंच तिने This or That असं चाहत्यांना विचारलं असताना अनेक चाहत्यांनी तिला प्रतिसाद देत,मराठी फूड कि सौथ इंडियन फूड,वडापाव कि मिसळ,मुंबई कि कोल्हापूर,कॅट वर डॉग असे अनेक प्रश्न विचारले आणि यावर तिने मजेशीर उत्तर देखील दिलीत. तिच्यासोबत तिचे आईवडीलदेखील हा गेम एन्जॉय करत आहे.
====
हे देखील वाचा–आत्ता ‘या’ कारणानेही प्राजक्ता माळी झाली ट्रोल
====
पण एका चाहत्याने अप्पू की ज्ञानदा असं देखील तिला विचारलं आहे, तर हा प्रश्न तिला खूप आवडला असून तिने उत्तर न देता तिच्या बाबांनी यावर भन्नाट उत्तर दिल आहे,अप्पू-ज्ञानदा दोन्ही नाही तर “नेण्या” असं उत्तर तिच्या बाबांनी दिलं. तर नेण्या हे काय अप्पूचं टोपण नाव आहे का?अशी चर्चा लगेच रंगली. तर हो नेण्या हे अप्पूचं टोपण नाव आहे. तर नेण्या असं नाव का असा प्रश देखील एका चाहत्याने विचारला असता याचं उत्तर थेट तिच्या आई बाबांनी दिलंय. “तर त्यांनी लाडाने ज्ञानदाचं नाव नेण्या असा शॉर्ट फॉर्म केला आहे. ज्ञानदा हे स्पष्ट बोलताना तिला फार हुशार असल्यासारखा समजतो पण तास नाही म्हणून नेण्या बोलतो” असं त्यांनी सांगितलं. तर आता अप्पूच्या म्हणजे ज्ञानदाच्या टोपण नावाचा खुलासा झालं आहे.(Dnyanada Ramtirthkar)
यासोबत अप्पूवर अनेक प्रश्नाचा भडीमार होत असून अप्पू या प्रश्नांची मजेशीर उत्तर देताना दिसयते ज्ञानदाने सुरुवातीला थिएटर आर्टिस्ट म्हणून काम केले.२०१६-१७ या वर्षात ती टीव्ही इंडस्ट्रीत आपलं नशीब आजमवण्यासाठी मुंबईत आली आणि त्यानंतर सिनेसृष्टीतील तिच्या प्रवासाला सुरुवात झाली.२०१७ मध्ये तिने ‘सख्या रे’ या मराठी मालिकेपासून अभिनय क्षेत्रामध्ये आपले पहिले पाऊल ठेवले. यात तिची वैदही ही व्यक्तिरेखा प्रचंड गाजली. प्रेक्षकांनीही तिच्या भूमिकेचे फार कौतुक केले.तर सध्या ज्ञानदा ही ठिपक्यांची रांगोळी या मालिकेतील अपूर्वा हे पात्र साकारताना पाहायला मिळत आहे.