मंगळवार, सप्टेंबर 1, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“युरोप फिरायचं होतं म्हणून…”, ‘दिया और बाती’मधील संध्याने केलं लग्न, एक मुल झाल्यानंतर अभिनेत्रीचा मोठा खुलासा, म्हणाली, “फिरण्यासाठी…”

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 1, 2024 | 12:26 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Diya aur Baati fame actress on marriage

"युरोप फिरायचं होतं म्हणून...", 'दिया और बाती'मधील संध्याने केलं लग्न, एक मुल झाल्यानंतर अभिनेत्रीचा मोठा खुलासा, म्हणाली, "फिरण्यासाठी..."

टेलिव्हिजनवरील ‘दिया और बाती हम’ ही मालिका आजही सर्वांच्या लक्षात आहे. त्यातील संध्या बिंदणी व भाबो ही पात्र आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. गृहिणी ते पोलिस ऑफिसर असा संध्याचा प्रवास मालिकेमध्ये पाहायला मिळाला. 6 वर्ष या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंज केले. त्यानंतर 2016 ला मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. पण या मालिकेतील संध्याची भूमिका करणारी दीपिका सिंह आज तिच्या नवीन मालिकेमुळे चांगलीच चर्चेत आहे. सध्या ती ‘मंगल लक्ष्मी’ मालिकेतून प्रेक्षकांच्या समोर येत आहे. (Diya aur Baati fame actress on marriage)

2016 नंतर दीपिका ही अभिनयापासून दूर असलेली दिसली. पण ती सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप सक्रिय होती. नृत्य व अभिनयाच्या माध्यमातून ती प्रेक्षकांचे मनोरंजन करत होती. आता बराच कालावधीनंतर ती मालिकाविश्वात पदार्पण करत आहे. ‘मंगल लक्ष्मी’मध्ये ती ‘मंगल’ची भूमिका साकारत आहे. यानिमित्ताने तिने ही मालिका निवडण्याचे कारण सांगितले आहे. ती म्हणाली की, “मला या मालिकेची स्क्रिप्ट खूप आवडली. ‘मंगल’ हे पात्र कुटुंबाला धरून ठेवणारे आहे. मी एक महिला आहे त्यामुळे ही भूमिका अतिशय भावली आणि म्हणून मी या मालिकेची निवड केली”, असे तिने सांगितले.

आणखी वाचा – “केलेली मदत सांगून…”, घरातल्या कामवालीला केलेली मदत विशाखा सुभेदारने सांगितली, नेटकरी भडकताच अभिनेत्रीचं स्पष्टीकरण, म्हणाल्या, “तिची मेहनत…”

View this post on Instagram

A post shared by Deepika Singh (@deepikasingh150)

याबरोबरच तिने तिचा अभिनय क्षेत्रातील संघर्ष आणि प्रेमकहानीबद्दलही भाष्य केले आहे. ती म्हणाली की, “मला आधीपासूनच अभिनयाची आवड होती. दिल्ली ते नोएडापर्यंत मी अनेक कार्यक्रम करायचे. याला घरच्यांचा आधी विरोध होता पण मला त्यांनी कधी थांबवलं नाही”, असं तिने सांगितलं.

आणखी वाचा – Video : जबरदस्त डान्स अन् शाही थाटमाट; तितीक्षा-सिद्धार्थच्या लग्नाचा थाटच न्यारा, कलाकार मंडळींनी धरला ठेका आणि…

पुढे ती लग्नाबद्दल सांगताना म्हणाली की, “रोहित खूप चांगला आहे. तो नेहमी मला पाठिंबा देतो. सुरवातीला केवळ आमची जात वेगळी असल्याने अडचणी येत होत्या. पण नंतर घरचेही लग्नासाठी तयार झाले”, असे ती म्हणाली. या मुलाखतीदरम्यानचा एक मजेशीर किस्सा ती सांगताना म्हणाली की, “एकदा मी व रोहित बोलत असताना मी रोहितला म्हणाले की युरोपला फिरायला जाऊया. त्यावर रोहितने उत्तर दिले की, मी मालिकेचा दिग्दर्शक आहे त्यामुळे मी तुझ्याबरोबर नाही फिरू शकत. मी अभिनेत्रीबरोबर फिरलो तर चुकीच्या चर्चा होतील. पण जर लग्न केलं तर नक्की फिरू शकतो. त्यावर मी लगेच म्हणाले की चल लग्न करूया. मी घरी जाऊन आई-वडिलांना सांगितले की मला युरोप फिरायचं आहे त्यामुळे मी लगेच लग्न करतेय आणि मला फक्त रोहितबरोबरच फिरायचं आहे”, असं तिने सांगितले. त्यानंतर दोघेही लग्नबंधनात अडकले.

सध्या दीपिका ‘मंगल लक्ष्मी’मध्ये काम करत असून तिला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.      

Tags: deepika singhDiya aur bati humHindi serialhusand wiferohit raj goyaltv serial
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
 Badshah and Isha Rikhi announced Divorce
Entertainment

पाच महिन्यानंतच संसार मोडला, सुप्रसिद्ध गायकाचा घटस्फोट, लग्नापूर्वी चार वर्ष केलं एकमेकांना डेट अन्…

सप्टेंबर 1, 2026 | 7:58 am
Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Next Post
Ranveer Singh is taking care of Deepika Padukone during her pregnancy in crowd video viral

Video : दीपिका पदुकोणची गरोदरपणात अशी काळजी घेत आहे रणवीर सिंह, गर्दीमध्ये अडकल्यानंतर त्याने काय केलं पाहा?, व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.