शुक्रवार, ऑगस्ट 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Diwali 2025 : नरक चतुर्दशीला करा हे पाच लक्ष्मी उपाय, कर्ज आणि गरीबीच्या समस्यांपासून व्हाल मुक्त

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 20, 2025 | 8:00 am
in Lifestyle
Reading Time: 1 min read
google-news
Narak Chaturdashi 2025

Diwali 2025 : नरक चतुर्दशीला करा हे पाच लक्ष्मी उपाय, कर्ज आणि गरीबीच्या समस्यांपासून व्हाल मुक्त

Narak Chaturdashi 2025 : यावर्षी छोटी दिवाळी म्हणजेच नरक चतुर्दशी १९ ऑक्टोबर २०२५ रोजी आहे. हा दिवस आर्थिक लाभासाठी आणि नकारात्मक उर्जेपासून मुक्त होण्यासाठी उत्तम मानला जातो. मान्यतेनुसार या दिवशी काही विशेष उपाय केल्याने जीवनातील कर्जाचा बोजा तर दूर होतोच शिवाय घरात सुख-समृद्धीही येते. या दिवशी यमाची उपासना केल्याने दुःख आणि दारिद्रही नष्ट होते. छोट्या दिवाळीच्या दिवशी घराच्या दक्षिण दिशेला दिवा लावणे शुभ मानले जाते. हा दिवा यमराजाला समर्पित आहे. असे केल्याने अकाली मृत्यूची भीती नाहीशी होते. याशिवाय आर्थिक संकटही हळूहळू संपू लागते.

छोट्या दिवाळीच्या दिवशी तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावणे खूप शुभ मानले जाते. असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते. याशिवाय घरात पैशांची आवकही सुरुच असते. जर तुम्ही दीर्घकाळ कर्जात अडकले असाल तर छोट्या दिवाळीच्या रात्री देवी लक्ष्मीसमोर बसून ‘ओम ह्रीं श्रीं क्लीम नमः’ या मंत्राचा १०८ वेळा जप करा. या उपायामुळे पैशाची कमतरता आणि कर्जाचा दबाव कमी होतो.

आणखी वाचा – जिनिलिया देशमुखचं पुतणीबरोबर आहे खास बॉण्डिंग, धनत्रयोदशीला औक्षण करताच अभिनेत्रीच्या डोळ्यात पाणी अन्…; व्हिडीओ व्हायरल

छोट्या दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीच्या चरणी चांदीचे नाणे किंवा गोमती चक्र ठेवा आणि तिची पूजा करा. पूजेनंतर ते तुमच्या पर्समध्ये किंवा पैशाच्या ठिकाणी ठेवा. असे केल्याने अचानक खर्च थांबतो आणि पैशाचा ओघ वाढू लागतो. हा उपाय विशेषतः व्यावसायिकांसाठी फायदेशीर आहे. छोट्या दिवाळीला घर पूर्णपणे स्वच्छ करुन सर्व कोपऱ्यात दिवे लावा. असे म्हणतात की ज्या घरात अंधार नसतो, तेथे कर्ज आणि संकटे नसतात. दिवा दान करताना, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची प्रार्थना करा की तुमच्या जीवनातील सर्व आर्थिक अडथळे दूर होतील आणि समृद्धी कायमची स्थापित होईल.

Tags: Diwali 2025Goddess LaxmiNarak Chaturdashi 2025
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Lagnantar Hoyilch Prem Promo
Entertainment

‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेत मोठा ट्विस्ट! कॉलेजमध्येच नंदिनीने केली काव्याची डिलिव्हरी, प्रोमो पाहून प्रेक्षक थक्क

ऑगस्ट 20, 2026 | 5:54 pm
Monsoon Kitchen Tips
Lifestyle

पावसाळ्यात मीठ वारंवार ओलसर होतंय? ‘या’ किचन टिप्स वापरून व्हा समस्येपासून मुक्त

ऑगस्ट 19, 2026 | 11:19 am
Munna Bhai Fame actor's Car Hits Two People
Entertainment

‘लगे राहो मुन्ना भाई’ फेम अभिनेत्याच्या कारची स्कूटरला धडक; दोन जण गंभीर जखमी

ऑगस्ट 18, 2026 | 2:05 pm
Govinda On Affair Rumours
Entertainment

“खरं प्रेम अस्तित्वात आहे का?”; कश्मीरा शाहच्या पोस्टने वेधलं चाहत्यांचं लक्ष, म्हणाली, “लग्न, प्रेम…”

ऑगस्ट 17, 2026 | 5:59 pm
Next Post
shantanu gangane news

"वयाच्या ४१व्या धनत्रयोदशीचा अर्थ समजला", पारू फेम अभिनेत्याच्या पत्नीने मागितली माफी, म्हणाली, "सोनं-चांदी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.