shantanu gangane news : सध्या सर्वत्र दिवाळीची धामधूम पाहायला मिळत आहे. काल म्हणजे १८ ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी अगदी थाटामाटात साजरी करण्यात आली. हिंदू धर्मात धनत्रयोदशी हा सण अत्यंत शुभ आणि मंगलमय मानला जातो. या दिवसापासून दिवाळीची खऱ्या अर्थाने सुरुवात होते. आणि याच दिवशी धन्वंतरी, देवी लक्ष्मी आणि कुबेरची मनोभावे पूजा केली जाते. हा दिवस नेमका कसा साजरा केला जावा याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. अनेक रील व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. त्यामुळे बऱ्याच लोकांना यंदा धनत्रयोदशीचा अर्थ खऱ्याने कळाला आहे.
यांबाबत आता मराठमोळ्या अभिनेत्याच्या पत्नीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. धनत्रयोदशीचा अर्थ आज तिला खऱ्याने कळला असल्याचं तिने या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. पारू फेम अभिनेता शंतनू गांगणेच्या पत्नीने हा मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शंतनूची पत्नी म्हणते, “मला माफ करा… ‘धनत्रयोदशीचा’ खरा अर्थ आज समजला. शंतनू मी तुझी माफी मागते. कारणही सांगते. आज धनत्रयोदशी आहे आणि वयाच्या ४१ व्या वर्षी मला ही गोष्ट समजली की, याचा आणि सोनं-चांदी खरेदी करण्याचा काहीच संबंध नाहीये”.
पुढे ती म्हणाली, “यादिवशी धन्वंतरीचे पूजन केले जाते. हिंदू परंपरेनुसार आरोग्याची देवता म्हणजे धन्वंतरी… समुद्र मंथनाच्या वेळी ही देवता प्रकट झाली. लग्नानंतर मी तुला खूप त्रास दिला की, धनत्रयोदशीला सोनं खरेदी करायचंय, चांदी खरेदी करायचीये. आज मला यामागचा खरा अर्थ समजला”. असा मजेशीर व्हिडीओ तिने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
आणखी वाचा – Diwali 2025 : नरक चतुर्दशीला करा हे पाच लक्ष्मी उपाय, कर्ज आणि गरीबीच्या समस्यांपासून व्हाल मुक्त
पुढे हा व्हिडीओ शेअर करत त्याखाली कॅप्शन देत तिने असं म्हटलं की, “सारांश – तुमच्या पतीला भावनिकदृष्ट्या ब्लॅकमेल करण्यापूर्वी जरा रिसर्च करा.” शंतनू आणि त्याच्या पत्नीचा हा मजेशीर व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. आणि अनेकांनी कमेंट करत या व्हिडीओवर लाईक्सचा वर्षाव केला आहे.





