चंदेरी दुनियेच्या झगमगत्या विश्वातील सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे कास्टिंग काउच. मनोरंजन विश्वात काम करणाऱ्या अनेक अभिनेत्रींना कास्टिंग काउचचा वाईट आउभाव आला आहे. पूर्वी अभिनेत्री याबद्दल घडणाऱ्या प्रसंगांबद्दल व्यक्त होत नव्हत्या. पण आता अभिनेत्री त्यांच्याबाबत घडलेल्या घटना स्वत: सांगतात. आतापर्यंत अनेक अभिनेत्रींनी झगमगत्या विश्वात स्वतःचं स्थान पक्क करण्यासाठी कास्टिंग काऊचचा सामना केला आहे. तर जाणून घेऊयात अशा अभिनेत्रींबद्दल, ज्यांना कास्टिंग काउचच्या वाईट अनुभवाला सामोऱ्या गेल्या आहेत.
लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री दिव्या ही कास्टिंग काउचची शिकार झाली आहे. तिने एका मुलाखतीत सांगितले होते की, जेव्हा तिने इंडस्ट्रीत प्रवेश केला होता आणि तिला मोठा ब्रेक हवा होता. तेव्हा एका दिग्दर्शकाने तिला त्याच्याबरोबर राहण्यास सांगितले होते.
बॉलिवूड स्टार मिथुन चक्रवर्तीची सून व ‘अनुपमा’ या लोकप्रिय मालिकेतून् प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री मदलासा चक्रवर्तीलाही कास्टिंग काउचचा अनुभव आला होता. ई-टाइम्सच्या रिपोर्टनुसार, ती म्हणाली होती की, “आजच्या काळात चूक कोणाचीही होऊ शकते, मग तो मुलगा असो किंवा मुलगी”.
टीव्ही अभिनेत्री जस्मिन भसीनने तिच्या कास्टिंग काउचबद्दल असं म्हटलं होतं की, “एक दिग्दर्शक होता ज्याने तिला तिचे कपडे काढण्यास सांगितले होते. यावेळी ती खूप घाबरली होती आणि तिला काय होत आहे हेदेखील समजत नव्हते. मात्र, तिने हे होऊ दिले नाही.”
अभिनेत्री किश्वर मर्चंटही कास्टिंग काउचचा अनुभव आला होता. तिने एका मुलाखतीत सांगितले होते की, “एका अभिनेत्याने तिला काम देण्याच्या बहाण्याने वन नाईट स्टँडबद्दल विचारले होते. जे त्याच्यासाठी खूप भयानक होते. पण तिने याबद्दल ऐकले नाही, ज्यामुळे त्याला काम मिळण्यात अडचणी येत होत्या”.
अनेक धार्मिक टीव्ही मालिकांमध्ये दिसलेली अभिनेत्री शिव्या पठानिया हिनेही कास्टिंग काउचबद्दल आपला अनुभव सांगितला. तिने एका मुलाखतीत सांगितले होते की, “तिच्याकडे काम नसताना तिला एका निर्मात्याचा फोन आला आणि त्याने अभिनेत्रीकडे तडजोडीची अट ठेवली.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ सारख्या शोमध्ये दिसलेली अभिनेत्री आराधना शर्मादेखील कास्टिंग काउचची शिकार झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिने एका मुलाखतीत सांगितले होते की, जेव्हा ती कास्टिंग डायरेक्टरबरोबर एका भूमिकेची स्क्रिप्ट वाचत होती, तेव्हा तिला अयोग्यरित्या स्पर्श करण्यात आला ज्यामुळे ती घाबरली”.
आणखी वाचा – ‘बिग बॉस’ मराठीच्या पाचव्या पर्वात जुने स्पर्धक सहभागी होणार?, कलाकारांच्या पोस्टमुळे चर्चा, उत्सुकता शिगेला
शिल्पा शिंदेने यापूर्वी ‘भाबी जी घर पर हैं’मध्ये अंगूरी भाभीची भूमिका साकारली होती. जवळपास २०० भाग केल्यानंतर तिने हा शो सोडला आणि निर्मात्यांवर लैंगिक छळाचा आरोप केला. मात्र, शिल्पाने फी वाढवण्याची मागणी केल्याचे निर्मात्यांनी स्पष्ट केले होते.