रविवार, एप्रिल 5, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

दिव्या बनली नवी कॅप्टन?, ‘बिग बॉस’ने पूर्ण गेम पलटवला; घरातील सदस्य दिव्याच्या विरोधात, म्हणाले, “कॅप्टन्सी पदासाठी दिव्या अनुभवी नाही”

Majja Webdeskby Majja Webdesk
जानेवारी 20, 2026 | 10:54 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi Season 6

घरातील सदस्य दिव्याच्या विरोधात

Bigg Boss Marathi Season 6 : ‘बिग बॉस मराठी’ सिझन ६ च्या घरात दिवसेंदिवस खेळ अधिकच रंगतदार होत चालला आहे. नवव्या दिवशी घरात कॅप्टन्सी कार्य पार पडणार असून, या कार्यामुळे घरातील वातावरण चांगलंच तापणार असल्याचं पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस’ने यावेळी कॅप्टन्सी कार्यासाठी एक वेगळाच ट्विस्ट दिला आहे. स्पर्धकांसमोर दोन दरवाजे ठेवण्यात येणार असून, एक दरवाजा शेणाचा तर दुसरा मेणाचा असणार आहे. या दोन दरवाज्यांपैकी कोणता दरवाजा निवडायचा, यावरच पुढील खेळ अवलंबून असणार आहे.

दरम्यान, दुसऱ्या आठवड्याचा कॅप्टन कोण होणार?, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलं आहे. याआधी ‘लांडगा आला रे आला’ या टास्कमध्ये प्राजक्ता शुक्रेने सोनालीला हरवत पहिल्या आठवड्याची कॅप्टन्सी मिळवली होती. प्राजक्ताने दाखवलेला आत्मविश्वास आणि खेळातील चतुराईमुळे तिने हे पद मिळवलं होतं. आता नुकताच समोर आलेल्या नव्या प्रोमोमध्ये दुसऱ्या आठवड्याच्या कॅप्टन्सीसाठी उमेदवारी प्रक्रिया सुरू असल्याचं स्पष्ट दिसत आहे. यावेळी दिव्या शिंदे, दीपाली आणि विशाल हे तिघे कॅप्टन्सी पदासाठी दावेदार असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, या उमेदवारीदरम्यान घरातील इतर सदस्यांनी दिव्या कॅप्टन्सी पदासाठी योग्य नसल्याचं मत मांडल आहे. (Bigg Boss Marathi Season 6)

आणखी वाचा – प्रसिद्ध गायिकेने घेतला कामातून आणि नातेसंबंधातून ब्रेक; ‘ती’ पोस्ट व्हायरल, म्हणाली, “मी परत येईन की नाही…”

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

सागर कारंडे दिव्या मॅच्युअर नसल्याचं सांगताना दिसतो, तर सचिन कुमावत तिचा अनुभव कमी असल्याचं मत व्यक्त करतो. याशिवाय अनुश्रीदेखील दिव्या कॅप्टन्सीसाठी योग्य नसल्याचं स्पष्टपणे म्हणते. यावर दिव्या जोरदार प्रत्युत्तर देताना म्हणते की, “अनुभव जन्मतः येत नाही. जर तुम्ही अनुभवाच्या आधारावरच निर्णय घेत असाल, तर या मुद्द्यावर मी तुमच्या सगळ्यांच्या विरोधात उभी आहे.” दिव्याच्या या ठाम भूमिकेमुळे घरात वादविवाद अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. आता, दिव्या घरातील सदस्यांना तिची भूमिका पटवून देऊ शकेल का? की कॅप्टन्सीच्या मुद्द्यावरून घरात आणखी फूट पडणार? नवव्या दिवसाचं कॅप्टन्सी कार्य आणि त्यातून होणारे संघर्ष प्रेक्षकांसाठी नक्कीच उत्सुकता वाढवणारे ठरणार आहेत. (Bigg Boss Marathi Season 6)

आणखी वाचा – मराठी कलाविश्वावर शोककळा; सुप्रसिद्ध कलादिग्दर्शकाचे निधन, ब्रेनस्ट्रोक झाला आणि…

Tags: bigg boss marathi season 6entertainmentmarathi entertainment news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Vishal Kotian Untold Story
Entertainment

विशाल कोटियनचे UNKNOWN FACTS; दगडी चाळीतला मुलगा ते ‘बिग बॉस’चा MASTERMIND

एप्रिल 5, 2026 | 11:00 am
Famous Marathi Actor Son Name Ceremony
Entertainment

मराठमोळ्या अभिनेत्याने थाटात साजरा केला लेकाचा नामकरण सोहळा; हटके अंदाजात सांगितलं मुलाचं नाव

एप्रिल 4, 2026 | 1:12 pm
Rashmika and Vijay Devarkonda New Update
Entertainment

रश्मिका होणार आई? चाहत्यांना दिली GOOD NEWS; ‘त्या’ पोस्टमुळे चर्चांना उधाण

एप्रिल 4, 2026 | 12:05 pm
Piyush Mishra On Alcoholism
Entertainment

आईला नको नको ते बोलले, महिलांशी अश्लील संवाद केला; दारूच्या नशेत अभिनेत्याच्या आयुष्याची लागलेली वाट, म्हणाले…

एप्रिल 4, 2026 | 11:00 am
Next Post
Akash Nalawade Becomes Father

मुलगा झाला हो! 'साधी माणसं' फेम अभिनेता झाला बाबा; चाहत्यांकडून भरभरुन शुभेच्छांचा वर्षाव

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.