मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक संजय जाधव हे एक दिलखुलास व्यक्तिमहत्व आहे. संजय हे त्यांच्या बोलण्याच्या अनोख्या शैलीमुळे देखील ओळखले जातात. संजय जाधवांनी मराठी सिनेमाविश्वाला दुनियादारी, तू हि रे, खारी बिस्कीट या सारखे हिट चित्रपट दिले आहेत. सध्या संजय जाधव यांचे लंडनमध्ये त्यांच्या नवीन चित्रपटाचे शूट सुरु आहे. या निमित्ताने चित्रपटातले कलाकार रील बनवत संजय जाधवांची नक्कल करताना दिसत आहेत. (Prarthna Behere Reel Viral )
हे देखील वाचा: हे देखील वाचा: माधुरी दीक्षित आणि ऐश्वर्या राय यांच्या सीनची तुलना करणं नेटफ्लिक्सला पडलं महागात! बिग बँग थेअरी मधील ‘तो’ भाग डिलीट
या व्हिडियोमध्ये अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, अभिनय बेर्डे एकमेकांशी बोलत असताना तिथे कुशल येतो त्याला बघून प्रार्थना आणि अभिनय ए संजय सर आले. असं म्हणताना दिसत आहेत, तर कुशल संजय जाधवांसारखं हसताना आणि बोलत त्यांची नक्कल करताना दिसत आहे. हे सगळं सुरु असताना तिथे स्वतः संजय जाधव येतात आणि ते सुद्धा त्यांच्यासोबत हसू लागतात. हा व्हिडियो प्रार्थना बेहेरे ने शेअर केला असून या व्हिडियोला प्रार्थनाने Aeee Sanjay Sir Aale …. असे कॅप्शन दिले आहे. तर कुशल ने या व्हिडियोवर Gabbar ko Tino….. dar…gaye अशी कमेंट देखील केली आहे.
संजय जाधव यांचे नवीन आणि जुने काम (Prarthna Behere Reel Viral )
लवकरच “पुन्हा दुनियादारी” या नावाने दुनियादारी या चित्रपटाचा पार्ट २ घेऊन येत आहे. तरुण प्रेक्षकांची आवड लक्षात घेऊन या चित्रपटाच्या लेखकांनी दर्जेदार लेखन करत, संजय जाधव यांनी या चित्रपटाचे उत्तम दिग्दर्शन केले होते. दुनियादारी चित्रपट पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. तसेच संजय यांचा “कलावती” या नावाचा सुद्धा नवीन चित्रपट येत आहे या चित्रपटामध्ये अभिनेत्री अमृता खानविलकर ही आपल्याला मुख्य भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. संजय जाधवांनी अनुराधा नावाची एक वेब सिरीज सुद्धा बनवली आहे.

या व्यतिरिक्त संजय जाधव यांना अभिनयाची आवड आहे. त्यांनी त्यांच्या चित्रपटात सुद्धा छोटे मोठे रोल केले आहेत. ते सोशल मीडियावर देखील तितकेच सक्रिय असतात. ते त्यांच्या चाहत्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडियो आणि पोस्ट शेअर करत असतात. (Prarthna Behere Reel Viral )
हे देखील वाचा: ‘तुमच्या दोघांचं छान जमेल’ चाहत्यांचा राज कावेरीला खऱ्या आयुष्यातही एकत्र येण्याचा सल्ला