शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

रवी जाधव यांचा मुलगा परदेशात झाला पदवीधर, लेकाची कामगिरी पाहून आनंद गगनात मावेना, म्हणाले, “अभिमान वाटत आहे की…”

Saurabh Moreby Saurabh More
जून 15, 2024 | 7:04 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Ravi Jadhav shared a special post on son Atharva's graduation ceremony.

रवी जाधव यांचा मुलगा परदेशात झाला पदवीधर, लेकाची कामगिरी पाहून आनंद गगनात मावेना, म्हणाले, “अभिमान वाटत आहे की...” |

‘नटरंग’, ‘बालगंधर्व’ अशा लोकप्रिय मराठी चित्रपटाचे व ‘ताली’ या हिंदी सीरिजचे दिग्दर्शक रवी जाधव हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक आहेत. केवळ मराठीच नव्हे तर हिंदी सिनेविश्वातदेखील त्यांची विशेष लोकप्रियता आहे. त्यांनी फक्त मराठीच नव्हे, तर अनेक हिंदी चित्रपट व वेब सीरिजचं दिग्दर्शन आणि निर्मिती केली आहे. आपल्या दिग्दर्शनातून चर्चेत राहणारे रवी जाधव त्यांच्या सोशल मीडियावरही तितकेच सक्रिय असतात. सोशल मीडियावर ते त्यांचे फोटो व कामाबद्दलची माहिती शेअर करत असतात.

स्वत:च्या फोटोबरोबरच रवी जाधव हे त्यांच्या कुटुंबाबद्दलच्या काही पोस्टही शेअर करत असतात. काही दिवसांपूर्वी रवी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांचा मुलगा अथर्व जाधवने कॅनडामधून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं असल्याची माहिती दिली होती. अथर्वबरोबरचे काही फोटो पोस्ट करत रवी जाधव यांनी “माझ्या मुलाने नुकतीच OCAD युनिव्हर्सिटी, कॅनडातून डिजीटल फ्युचर्समध्ये बॅचलर ऑफ डिझाईन (ऑनर्स) पदवी पूर्ण केली” असं म्हटलं होतं.

आणखी वाचा – “अजिंक्य घरी बघत असेल माझी वाट”, शिवानी सुर्वेचा नवऱ्यासाठी हटके उखाणा, लाजत म्हणाली…

अशातच रवी यांनी सोशल मीडियावर अथर्वच्या दीक्षांत समारंभाचा खास व्हिडीओ शेअर करत त्यांच्या आनंदी भावना व्यक्त केल्या आहेत. या पोस्टमध्ये रवी यांनी त्यांच्या लेकाचे कौतुक करत असं म्हटलं आहे की, “आज आम्ही आमच्या मुलाची अतुलनीय कामगिरी साजरी करत असताना आम्हाला अभिमान वाटत आहे. त्याच्या दीक्षांत समारंभात त्याला रंगमंचावर पाहणे हा एक अमूल्य क्षण होता जो आम्ही कायमचा जपत राहू. त्याची मेहनत, समर्पण आणि चिकाटीला खऱ्या अर्थाने फळ मिळाले आहे याबद्दल त्याचे खूप खूप अभिनंदन”.

आणखी वाचा – दोन संसार मोडल्यानंतर ‘ही’ सुप्रसिद्ध अभिनेत्री तिसऱ्या लग्नामुळे चर्चेत, पूर्वाश्रमीच्या पतीवर शारीरिक संबंध व हिंसाचाराचे आरोप अन्…  

यापुढे त्यांनी लेकाबद्दल गौरवोद्गार काढत असं म्हटलं आहे की, “या ऐतिहासिक क्षणी त्याच्या चेहऱ्यावरील स्मितहास्य जितके उज्ज्वल होते, तितकेच त्याचे भविष्यही उज्ज्वल आहे आणि तो ते पूर्ण करेल असा आम्हाला विश्वास आहे. त्या सर्व आश्चर्यकारक गोष्टी पाहण्यासाठी आम्ही प्रतीक्षा करू शकत नाही. आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो”. दरम्यान, रवी जाधव यांनी शेअर केलेल्या या पोस्टखाली अनेकांनी रवी जाधव यांच्या लेकाचे म्हणजेच अथर्वचे कौतुक केलं आहे. “अभिनंदन, शुभेच्छा, पुढील वाटचालीबद्दल खूप शुभेच्छा, असाच कायम पुढे जात रहा, खूप मोठा हो” अशा अनेक कमेंट्स करत अथर्वच्या या कामगिरीबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

Tags: marathi directormarathi entertainment newsravi jadhav
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Anushka sharma troll after banglore stampede
Entertainment

“खोटं रडू नकोस, इतके पैसे कमावले पण…”, बंगळूर चेंगराचेंगरीवर पोस्ट करताच अनुष्का शर्मा ट्रोल, नेटकऱ्यांचा संताप

जून 6, 2025 | 2:30 pm
 Celebs Live In Rented Houses
Entertainment

कोट्यवधी कमावतात तरीही कलाकार भाड्याच्या घरात का राहतात?, कारण ऐकून व्हाल थक्क, जाणून घ्या…

जून 6, 2025 | 1:30 pm
Next Post
16 June 2024 panchang mesh to meen rashi bhavishya see the details

रविवारी मिथुन व तूळ राशीसह ‘या’ राशीच्या लोकांना प्रत्येक कामात यश मिळेल, आर्थिक लाभही मिळणार, जाणून घ्या...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.