शुक्रवार, मे 9, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : प्रसिद्ध दिग्दर्शकाने प्रियांका चोप्राच्या बहिणीला केलं किस, व्हिडिओ पाहून नेटकरीही भडकले

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 31, 2023 | 11:14 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Director forcefully kisses mannara chopra

Director forcefully kisses mannara chopra

चित्रपटसृष्टीत अभिनेत्रींना मिळणाऱ्या वागणूकीबद्दल बऱ्याच चर्चा होत असतात. ‘कास्टिंग काउट’सारख्या प्रकाराला कित्येक अभिनेते अभिनेत्रीसुद्धा बळी पडल्या आहेत. त्यामुळे या क्षेत्रात स्त्रियांबरोबर केल्या जाणाऱ्या वागणुकीची चर्चा सुरु झाली आहे. त्यात सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एक दिग्दर्शक एका अभिनेत्रीला बळजबरीने कीस करत असताना दिसत आहे. या व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. त्यामुळे पुन्हा या इण्डस्ट्रीत अभिनेत्रीसह होणाऱ्या वर्तवणूकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.(Director forcefully kisses mannara chopra)

या व्हिडीओत दिसणारी अभिनेत्री प्रियांका चोप्राची बहीण अभिनेत्री मन्नारा चोप्रा आहे. मन्नारने सुरूवातीला हिंदी चित्रपटसृष्टीत आपलं नशीब आजमवल्यानंतर तेलुगू चित्रपटसृष्टीकडे तिचा मोर्चा वळवला. गेल्या काही वर्षांपासून ती तेलुगू चित्रपटसृष्टीत कार्यरत आहे. लवकरच तिचा एक तेलुगू चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात मन्नार महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या टीझरच्या प्रदर्शिनावेळी घडलेल्या एका प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे.

वाचा – काय घडला नेमका प्रकार?(Director forcefully kisses mannara chopra)

Director kisses an actress earlier today!pic.twitter.com/JzyBbau45d

— Manobala Vijayabalan (@ManobalaV) August 28, 2023

आणखी वाचा – Video : तेजश्री प्रधानच्या ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या शीर्षकगीताला प्रेक्षकांची भरभरुन पसंती, व्हिडीओ तुम्ही पाहिलात का?

या व्हिडीओत चित्रपटाचे दिग्दर्शक ए. एस. रवीकुमार चौधरी हे मन्नारासह फोटोसाठी पोज देत होते. पण त्यानंतर त्यांनी मन्नाराला जबरदस्ती कीस केली. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे मन्नाराही अचंबित राहिली. तिच्या परवानगी शिवाय घडलेल्या या प्रकारावर सगळीकडूनच संताप व्यक्त होत आहे. दिग्दर्शकाने तिच्यासह केलेल्या प्रकाराचा सोशल मीडियावरही नेटकरी कमेंट करत संताप व्यक्त करत आहेत. एका नेटकऱ्याने तर ‘अशा लोकांवर लगेच कारवाई करायला हवी’ अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहीलं की, ‘कॅमेऱ्यासमोर ही अवस्या आहे तर मग बंद दरवाज्यामागे काय काय चालत असेल?’ असा प्रश्न उपस्थित केला.

आणखी वाचा – “’तेरे नाम २’ची तयारी का?”, सलमान खानचा बदलता लूक पाहून नेटकरीही पडले बुचकळ्यात, म्हणाले, “हा तर…”

मन्नाराने विवेक अग्निहोत्री यांच्या ‘जिद’ चित्रपटातून बॉलिवूडमध्य पदार्पण केलं होतं. यानंतर ती बॉलिवूडच्या कोणत्याही चित्रपटात झळकली नाही. त्यानंतर ती दाक्षिणात्य चित्रपटांकडे वळली. आता येणाऱ्या चित्रपटात तिच्यासह राज तरूण हा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर मकरंद देशपांडे हे खलनायकाची भूमिका साकारणार आहेत.  

Tags: bollywood newspriyanka choprasouth actressvideo viral
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Pakistani Person Viral Video
Social

“त्यांना न्याय मिळाला”, पाकिस्तानी नागरिकाकडून भारतीय सैन्याचे कौतुक, पाक सैन्याला खडेबोल सुनावत…

मे 9, 2025 | 4:08 pm
Neha Kakkar Attends Driver Wedding 
Entertainment

नेहा कक्करची ड्रायव्हरच्या लग्नात उपस्थिती, नवरी मुलगी नमस्कार करण्यास खाली वाकताच घेतलं जवळ, गायिकेच्या कृतीने जिंकलं मन

मे 9, 2025 | 1:03 pm
virat kohli and rahul vaidya fight
Entertainment

विराट कोहलीला डिवचनं राहुल वैद्यला पडलं महागात, क्रिकेटरच्या भावाने सुनावलं, म्हणाला, “मूर्ख, फॉलोवर्स वाढवण्यासाठी…”

मे 9, 2025 | 12:30 pm
soldier duty over marriage
Social

हळद फिटली नसतानाही जवान लग्नाच्या तिसऱ्या दिवशी कामावर रुजू, आई-वडील भावुक तर पत्नीचा खंबीर पाठिंबा, मन हेलावणारा व्हिडीओ

मे 9, 2025 | 11:22 am
Next Post
Namrata Sambherao On Rudraaj Sambherao

"Happy Birthday Aai …" नम्रता संभेरावला लेकाने दिलं स्वकष्टाने बनवलेलं गिफ्ट, गिफ्ट पाहून म्हणाली, "या दिवसाची…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.