शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘सुख म्हणजे…’ मालिकेच्या कलाकारांचा पुन्हा एक नवा शो येणार, महेश कोठारेंची मोठी घोषणा, म्हणाले, “लवकरच…”

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 22, 2024 | 6:00 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Director and producer Mahesh Kothare announced that a new show will soon be launched with the cast of Sukh Mhanje Nakki Kay Asta

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’च्या कलाकारांसह लवकरच एक नवीन शो येणार, दिग्दर्शक व निर्माते महेश कोठारे यांची घोषणा

मागील अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं!’ ही लोकप्रिय मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. नुकताच या मालिकेच्या शेवटच्या भागाचं शुटींग पूर्ण झालं. स्टार प्रवाह वाहिनीवर सध्या अनेक नव्या मालिकांचा ओघ सुरु आहे. त्यामुळे जुन्या मालिका या प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत. याआधी पाच वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करुन ‘आई कुठे काय करते’ ही मालिका संपली. त्यानंतर आता ‘सुख म्हणजे काय असतं’ ही मालिकाही लवकरच ऑफ एअर जाणार आहे. गौरी आणि जयदीपची ही गोष्ट सुरुवातीला प्रेक्षकांना फारच भावली. त्यानंतर या मालिकेचा ट्रॅक बदलण्यात आला. (Sukh Mhanje Nakki Kay Asta cast new show)

मालिकेने जवळपास सात वर्षांचा लीप घेतला. तेव्हा प्रेक्षकांनी मात्र बरीच नाराजी व्यक्त केली होती. मात्र तरीही प्रेक्षक या मालिकेवर तितकंच प्रेम करत होते. आशातच आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. कोठारे व्हिजन निर्मित ही मालिका सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. मालिकेसह यातील कलाकारांनाही प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिका सुरुवातीपासून टीआरपीच्या शर्यतीत होती. 

 

आणखी वाचा – ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई, विधींना सुरुवात, खास फोटो शेअर करत म्हणाली, “शुभ…”

मालिका संपत असली तरी याच मालिकेच्या कलाकारांना घेऊन पुन्हा एकदा एक नवीन शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. याबद्दल मालिकेचे निर्माते महेश कोठारे यांनी घोषणा केली आहे. इट्स मज्जाबरोबर संवाद साधताना महेश कोठारे यांनी असं म्हटलं की, “मालिकेचा दूसरा भाग किंवा सीझनबद्दल माहीत नाही. पण याच कलाकारांना घेऊन एक नवीन शो लवकरच सुरु होणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरच हा शो येईल अशी मला आशा आहे आणि सध्या माझे त्यासाठीचे प्रयत्न सुरु आहेत”.

आणखी वाचा – ‘बिग बॉस’साठी काय पण! प्रसिद्ध गायकाच्या मुलाची शोमध्ये जाण्यासाठी काळी जादू, स्वत:च धक्कादायक खुलासा करत म्हणाला…

त्यामुळे आता सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या कलाकारांसह महेश कोठारे कोणता नवीन शो घेऊन येणार? या शोमध्ये नवीन काय बघायला मिळणार? हा नवीन शो नक्की कधी येणार? याची उत्सुकता मालिकेच्या व मालिकेतील कलाकारांच्या चाहत्यांना लागून राहिली आहे. त्यामुळे अनेक जण या आगामी शोच्या उत्सुकतेत आहेत ही नक्की…

Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
23 december 2024 daily horoscope Monday is a good day in terms of job-business, will get benefits and advancement opportunities

23 December Horoscope : सोमवारचा दिवस नोकरी-व्यवसायाच्या दृष्टीने चांगला, लाभ अन् प्रगतीच्या संधी, जाणून घ्या...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.