शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या एकुलत्या एक लेकीचं निधन, फक्त ताप आला अन्…; कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 6, 2024 | 6:14 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Divya seth shah daughter passed away

प्रसिद्ध अभिनेत्री दिव्या सेठ शाहच्या मुलीचं निधन

Divya seth shah daughter passed away : मनोरंजन क्षेत्रातून सध्या अनेक दुखद बातम्या समोर येत आहेत. नुकताच बॉलिवूड अभिनेत्री दिव्या सेठ शाहच्या मुलीचे निधन झाले आहे. कमी वयात मिहीकाचे निधन झाल्याने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. मुलीचे निधन झाल्याची माहिती स्वतः दिव्या यांनी दिली आह. ५ ऑगस्ट २०२४ रोजी तिला खूप ताप आला आणि त्यातच तिला अटॅक आल्याने तिचे निधन झाले. तिचे निधन झाल्याने संपूर्ण कुटुंबालाच धक्का बसला आहे. ८ ऑगस्ट रोजी मृत्यू पश्चात शोकसभा आयोजित करण्यात आली आहे.

दिव्या यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये मिहीकाची ८ तारखेला शोकसभा आयोजित करण्यात आल्याचे लिहिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिव्या यांची मुलगी दीर्घ काळापासून आजारी होती. दरम्यान काही दिवसांपूर्वीच दिव्या यांनी मुलीबरोबरचा एक फोटो शेअर केला होता. यामध्ये लिहिले होते की, “डीएनए हे एक मिथ्य आहे. बाकी सर्व काही मेहनतीने मिळवता येतं. मातृत्वाबद्दल आभार”. मिहीका ही आईप्रमाणे अभिनेत्री नव्हती. तिने फोटोग्राफीमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला होता. तिने ५ मे रोजी आईबरोबर शेवटचा फोटो शेअर केला होता. यामध्ये ती आजीबरोबर आपला वेळ घालवताना दिसत आली होती.  

आणखी वाचा – मेहंदी, पारंपरिक साडी, नाकात नथ अन्…; लग्नानंतरच्या पहिल्या मंगळागौरसाठी नटली स्वानंदी टिकेकर, संस्कृती जपल्यामुळे कौतुक

दिव्या यांच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर त्या टेलिव्हिजनमधील एक आघाडीच्या अभिनेत्री आहेत. तसेच चित्रपटांमध्येही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. ‘जब वी मेट’, ‘इंग्लिश विंग्लिश’, ‘दिल धडकने दो’, ‘आर्टिकल ३७०’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच ‘द मॅरीड मॅन’, ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ व ‘दुरंगा’ अशा वेबसिरिजमध्येही दिसून आल्या आहेत.

आणखी वाचा – “१२-१३ तास कळा सहन करणाऱ्या बायका वेड्या का?”, ‘सातव्या मुलीची…’चा प्रोमो पाहून भडकले प्रेक्षक, म्हणाले, “अतिशय फालतू…”

त्यांच्या प्रमाणेच दिव्या यांची आईदेखील एक लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांनी आजवर ‘सिलसीला’, ‘प्रेमरोग’, ‘राम तेरी गंगा मैली’, ‘कभी खुशी कभी गम’ व ‘कल हो ना हो’ अशा मोठ्या चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. तसेच आजवर अक्षय कुमार, ऋषि कपूर, शाहरुख खान, ऋतिक रोशन, अनिल कपूर व प्रीती झिंटा या कलाकारांच्या आई, आजी अशा भूमिकाही साकारल्या आहेत.

Tags: daughterdivya seth shahpassed away
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Sajna Movie Song
Entertainment

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘सजना’ चित्रपटातील ‘रात सजनाची’ गाण्याची हवा, हळवी बाजू मांडत जिंकली प्रेमीयुगुलांची मनं

जून 5, 2025 | 5:48 pm
Vibhu Raghave Death
Entertainment

“आता वेदना होणार नाहीत”, कॅन्सरमुळे मृत्यू झालेल्या विभू राघवसाठी अभिनेत्री भावुक, अंत्यसंस्कारावेळीही ढसाढसा रडताना दिसली आणि…

जून 5, 2025 | 5:18 pm
Next Post
Bigg Boss Marathi Update nikki tamboli and arya jadhva fight

Bigg Boss Marathi : आर्या व निक्की तांबोळीमध्ये मारामारी, गेमसाठी माणुसकीही संपली, ढकलून दिलं अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.