‘धूम’या चित्रपटामुळे ईशा देओल अधिक प्रकाशझोतात आली. पण याधी आधी तिची ओळख अभिनेते धर्मेंद्र व हेमा मालिनी यांची मुलगी म्हणून होत असे. मात्र ‘धूम’चित्रपटामुळे अधिक प्रसिद्धी मिळाली. पण ईशाच्या एका मुलाखतीमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यामध्ये तिने अमीषा पटेलने केलेल्या वक्तव्यावर भाष्य केले आहे. यामध्ये ती आपली बाजू मांडताना दिसत आहे. तसेच नेपोटीजमबद्दलही बोलताना दिसली. यामध्ये ईशा नक्की काय म्हणाली? हे आपण जाणून घेऊया. (esha deol on amisha patel)
‘गदर’ या चित्रपटामुळे अमीषा पटेल अधिक चर्चेत आली. त्यानंतर ती अनेक चित्रपटांमध्येदेखील दिसून आली. मात्र तिला अपेक्षित अशी प्रसिद्धी मिळू शकली नाही. काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीमध्ये अमीषाने स्टार किड्स मुळे किती संघर्ष करावा याबद्दल तिने सांगितले आहे. यामध्ये तिने करीना कपूर व ईशा देओल यांच्यावर निशाणा साधला आहे. करीना व ईशामुळे आपल्या हातातील रोल गेल्याचे तिने स्पष्ट केले आहे. पण यावर आता ईशाने सांगितले की, “तिने असे सर्व सांगितले का? मला असं वाटत की माझे विचार तिच्यापेक्षा वेगळे आहेत. आम्ही आमच्या आमच्या कामात व्यस्त होतो. माझी तेव्हा सगळ्या मुलींबरोबर खूप चांगली मैत्री होती आणि मला असं वाटत की मी तिच्याकडून एकही भूमिका हिरावून घेतली नाही”.
पुढे ती म्हणाली की, “अमीषा त्या दिवसांना घेऊन रडत बसली आहे. पण त्यावेळी आमच्यामध्ये खूप चांगली मैत्री होती. त्यावेळचे या क्षेत्रातील वातावरण खूप चांगले होते. आपापसात कोणत्याही प्रतिस्पर्धा नव्हत्या. आम्ही खूप खुश होऊन काम करायचो. आम्ही कोणीही कामाशिवाय बसलो नव्हतो”.
दरम्यान ईशाच्या या बोलण्यामध्ये राग दिसून येत आहे. २००३ साली अमीषाने ‘बॉलीवूड हंगामा’बरोबर बोलताना करियरच्या सुरुवातीचा काळ सांगितला आहे. तिने त्यावेळी सांगितले होते की, “ मी जेव्हा इथे आले तेव्हा ,माझ्याबरोबर अनेक निर्माते व अभिनेत्यांच्या मुलांनी या क्षेत्रात पाऊल ठेवले होते. यामध्ये करीना, अभिषेक बच्चन, ऋतिक रोशन, तुषार कपूर, ईशा, फरदीन खान यांनी अभिनय करण्यास सुरुवात केली होती. सगळीकडे फक्त स्टार किड्स दिसून येत होते. स्पर्धा वाढली होती त्यामुळे अनेकदा रोलही हातातून गेले”. अमीषाच्या या वक्तव्यानंतर मनोरंजन क्षेत्रात खळबळ उडाली होती.