‘धूम’, ‘धूम २’ यांसारखे सुपरहिट चित्रपट देणारे दिग्दर्शक संजय गढवी यांचे नुकतेच निधन झाले आहे. ते ५८ वर्षांचे होते. आज सकाळी मुंबईतील लोखंडवाला येथे मॉर्निंग वॉकदरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबियांसह बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे. (‘Dhoom’ fame Director Sanjay Gadhvi passed away)
समोर आलेल्या माहितीनुसार, संजय गढवी हे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी त्यांच्या घरातून बाहेर पडले. त्याचदरम्यान त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्यांना तातडीने कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. ते ज्या ठिकाणी मॉर्निंग वॉकसाठी जात होते, तेथून रुग्णालय अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर होतं.
हे देखील वाचा – ऐश्वर्या शर्मा व नील भट्ट महिन्याला कमावतात इतके रुपये, एका एपिसोडसाठी घेतात तब्बल इतकी रक्कम
दरम्यान, त्यांच्या निधनानंतर त्यांची लेक संजना हिने ‘नवभारत टाईम्स’शी बोलताना त्यांना कुठलाही प्रकारचा त्रास नव्हता. सध्या त्यांचं पार्थिव रुग्णालयात असून संध्याकाळच्या सुमारास त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जाणार असल्याचं बोललं जात आहे. त्यांच्या निधनानंतर ‘धूम’ फ्रेंचाईझीमधील कलाकारांसह अन्य बॉलिवूड कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे.
हे देखील वाचा – क्रिकेट विश्वचषकात भारतीय संघाच्या विजयासाठी प्राजक्ता माळीने घातले गणरायाला साकडे, फोटो शेअर करत म्हणाली, “आजची मॅच…”
16 Years of Dhoom2
— Sanjay Gadhvi (@SanjayGadhvi4) November 24, 2022
✊🏽@yrf pic.twitter.com/Pr58ABEmwV
संजय यांनी यशराज फिल्म्सच्या सुपरहिट ‘धूम’ व ‘धूम २’ चे दिग्दर्शन केले. ज्यामध्ये अभिषेक बच्चन, उदय चोप्रा, जॉन अब्राहम, ऐश्वर्या राय बच्चन आणि ऋतिक रोशन असे प्रसिद्ध कलाकार होते. मात्र, धूमच्या यशानंतर त्यांना अपयशाचा सामना करावा लागला. ज्यात ‘किडनॅप’, ‘अजब गजब लव्ह’ अश्या चित्रपटांचा समावेश आहे. त्यानंतर त्यांनी तब्बल १० वर्षांचा ब्रेक घेतला. आणि २०२० मध्ये आलेल्या ‘ऑपरेशन परिंदे’ चित्रपटाद्वारे ओटीटीवर कमबॅक केले होते.