Dhanashree Verma Yuzvendra Chahal Divorce Reason : नृत्यदिग्दर्शक धनश्री वर्मा आणि क्रिकेटपटू युजवेंद्र चहल यांनी नुकताच घटस्फोट घेतला. दोघांच्या नात्यात दुरावा येताच ते एकमेकांपासून कायमचे विभक्त झाले आहेत. लग्नाच्या दोन वर्षांनी त्यांच्यातील वाद वाढत गेला आणि ते एकमेकांपासून कायमचे वेगळे झाले. धनश्री आणि युजवेंद्र यांच्या विभक्त होण्याचे खरे कारण वेटरेनचे पत्रकार विक्की लालवान यांनी शेअर केले आहे. धनश्री आणि युजवेंद्र यांच्या घटस्फोटाबाबत दोघांनीही काहीच स्पष्टीकरण दिलं नाही. त्यामुळे ही जोडी नेमकी का वेगळी झाली हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक दिसले. अशातच आता समोर आलेल्या वक्तव्याने धनश्री व युजवेंद्र नेमके वेगळे का झाले याचं कारण कळलं आहे.
पत्रकार विक्की लालवान यांनी दोघांमधील घटस्फोटाचे खरे कारण काय आहे? याबाबत आपल्या अधिकृत इंस्टाग्राम पोस्टमधील स्त्रोतांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार भाष्य केले आहे. युजवेंद्र व धनश्री यांच्यात विभक्त होण्याचे कारण म्हणजे धनश्रीला मुंबईत राहण्याची इच्छा होती. तिने युजवेंद्रला हरियाणातील आपले घर सोडण्यास सांगितले. धनश्री आणि युजवेंद्र यांचे व्यक्तिमत्त्व, राहणीमान एकमेकांपेक्षा पूर्णपणे भिन्न होते.
पत्रकार विक्की याने पोस्ट शेअर करत लिहिलं की, “एका सूत्रांनी सांगितले आहे की युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा कधीही एकत्र नव्हते, कारण त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि राहणीमान भिन्न आहेत. त्याने धनश्रीला पटवून देण्याचा प्रयत्न केला की तिची मागणी चांगली नाही. दोघांनीही चर्चा केली, युक्तिवाद केला आणि भांडण केली. धनश्रीची युजीने आपली बॅग आणि वस्तू हरियाणाहून मुंबईत घेऊन जाव्यात अशी इच्छा होती”.
विकीने पुढे तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये दावा केला की, धनश्री हरियाणा येथे तिच्या युजवेंद्र आणि तिच्या पालकांसमवेत राहण्यासाठी गेली होती. जेव्हा जेव्हा तिला गरज असेल तेव्हा ती मुंबईला यायची. या पोस्टमध्ये असे लिहिले गेले आहे की, “लग्नानंतर युजी आणि धनश्री हरियाणा आणि मुंबई येथे युजीच्या पालकांसमवेत राहायला गेले आणि त्यांना आवश्यक तेव्हाच ते मुंबईत आले. होय, हे मुंबई-हरियाणा हे भांडण मुख्य कारणांपैकी एक होते. युजीने हे स्पष्ट केले की तो आपल्या आईवडिलांपासून आणि घरापासून दूर राहू शकणार नाही”. या पोस्टमधून त्यांच्या घटस्फोटाचे कारण जरी समोर आले असले तरी या दोघांनीही त्यांच्या घटस्फोटाचे कारण उघड केलेले नाही.