Comedian Kunal Kamra Song On Nirmala Sitharaman : सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे सुप्रसिद्ध स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामराचा वाद सध्या चर्चेत आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर त्याने एक गाणं तयार केलं. कुणालने हे गाणं त्याच्या एका शोमध्ये गायलं. तोच व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. हा व्हिडीओ पाहून सर्वत्र खळबळ माजली आणि राजकीय मंडळातून माफीची मागणी आली. मात्र, कुणालने माफी मागणार नाही असं स्पष्ट म्हटलं. यानंतर आता कुणालने केलेल्या आणखी एका गाण्याने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. कुणाल कामराने आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्याच्या एक्स हँडल आणि इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ते अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना लक्ष्यित करताना दिसला.
कुणाल कामराने निर्मला सीतारमणवर केलेलं गाणं कोणतं?
यावेळी त्याने केवळ निर्मला सीतारमणला लक्ष्य केले नाही तर हवा-हवाई गाण्याची चाल वापरून नवीन गाणं गाताना देशाच्या कर प्रणालीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हे गाणं यापूर्वी कुणालने प्रदर्शित केलं होतं आता हे गाणं त्याने पुन्हा रिपोस्ट करत साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. सुमारे दीड मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये, कुणाल कामरा अर्थमंत्री यांना प्रश्न विचारत आहे आणि सरकारच्या धोरणांवर प्रश्न विचारत आहे. व्हिडीओमध्ये, तो ‘हवा हवाई’ या प्रसिद्ध बॉलिवूड गाण्याच्या चालीवर गाताना दिसत आहे. कुणालने मुंबईतील त्याच्या एका शोमध्ये महाराष्ट्रातील राजकारण्यांवर गाणं गायलं. ज्यामध्ये त्याने ‘गद्दार’ सारखे शब्द नावे न घेता वापरली. हा कार्यक्रम जिथे झाला तेथे त्या जागेची तोडफोड केली गेली. मंगळवारी शिंदे यांच्या या विनोद प्रकरणात कामराला नोटीस देण्यात आली. आता पोलिसांनी त्यांना पुन्हा बोलावले आहे.
ऐका कुणाल कामराने निर्मला सीतारमण यांच्यावर केलेलं गाणं
इन सड़कों की बर्बादी करने सरकार है आई….
मेट्रो है इनके मन में खोदकर लें ये अंगड़ाई…
ट्रैफिक बढ़ाने ये है आई…
कहते हैं इसको तानाशाही.
देश में इतनी महंगाई सरकार के साथ है आई…
लोगों की लूटने कमाई साड़ी वाली दीदी आई…
सैलरी चुराने ये है आई कहते हैं…
कहते हैं इसको ‘निर्मला ताई’.
या प्रकरणात, कुणाल कामरानेही एक लांब विस्तृत पोस्ट केली आणि सरकारवर आणि त्यांच्या मजेदार प्रकरणात हॉटेल यूनिकॉन्टिनेंटलची तोडफोड करणार्यांवर राग रोखला.