शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

ना फोन-मॅसेज, ना भाऊबीजेच्या शुभेच्छा; अंकिता वालावलकर डीपी दादावर रागावली, समजूत काढत म्हणाला, “बहिणीने…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 25, 2025 | 12:11 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
ankita walawalkar dhananjay powar

ना फोन-मॅसेज, ना भाऊबीजेच्या शुभेच्छा; अंकिता वालावलकर डीपी दादावर रागावली, समजूत काढत म्हणाला, "बहिणीने…"

ankita walawalkar dhananjay powar : ‘बिग बॉस मराठी’ मुळे चर्चेत आलेली भाऊ-बहिणीची जोडी म्हणजे अंकिता वालावलकर आणि धनंजय पवार. अंकिता आणि डीपी दादाच्या जोडीने ‘बिग बॉस’च्या घरात अक्षरशः धुमाकूळ घातला. ‘बिग बॉस मराठी’मध्ये यंदा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला मोठी संधी मिळाली. यावेळी अंकिता आणि धनंजय पोवार हे दोन सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ‘बिग बॉस’च्या घरात धुमाकूळ घालताना दिसले. दोघांचाही खूप मोठा चाहतावर्ग आहे. अंकिता व डीपीने ‘बिग बॉस’च्या घरात असताना रक्षाबंधन साजरं केलं. अंकिताने डीपीला राखी बांधली. आणि ‘बिग बॉस’च्या घरात डीपी अंकिताच्या पाठीशी भाऊ म्हणून खंबीरपणे उभा राहिला.

‘बिग बॉस’ नंतरही घराबाहेरही ही बहीण-भावाची जोडी कायम चर्चेत आहे. दरवर्षी ते रक्षाबंधन, भाऊबीजनिमित्त एकत्र भेटतात आणि हे सण साजरे करतात. मात्र यावेळी भाऊबीजनिमित्त अंकिताने शेअर केलेल्या एका स्टोरीने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. आणि अंकिताच्या या स्टोरीने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. अंकिताने “यंदा डीपी दादांनी भाऊबीजेला फोन केला नाही”, असं तिने या स्टोरीमध्ये म्हटलं.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्रीचे वयाच्या २३व्या वर्षी निधन, ‘या’ गंभीर आजाराने गमावला जीव

या स्टोरीमध्ये अंकिता म्हणते, “धनंजय पोवार या माझ्या भावाने मला भाऊबीजेच्या शुभेच्छा देखील दिल्या नाहीत. भाऊबीजेला भावाने बहिणीकडे यायचं असतं पण, यायला नाही जमलं तर एक कॉल तरी?”. अंकिताची ही स्टोरी रिशेअर करत धनंजय म्हणतो, “भाऊ दिवाळीच्या व्यापारात व्यग्र होता वाटलं होतं बहिणीने समजून घेतले असेल पण, आता हीच माझी एक चूक समजून तुला लवकरच गिफ्ट देईन ते तुला नक्कीच आवडेल”.

आणखी वाचा – ‘तारक मेहता…’ फेम अभिनेत्याला मातृशोक, आईबरोबरच्या फोटोंचा व्हिडीओ शेअर करत भावुक, म्हणाला, “आठवण…”

पुढे त्याने अंकिताची समजूत काढत म्हटलं, “विसरलो नक्कीच नाही… तरी चुकलो असेन तर माफ कर…”. डीपी दादांनी लाडक्या बहिणीची माफी मागून लवकरच गिफ्ट देईन असं प्रॉमिस अंकिताला केलं आहे.

Tags: ankita walawalkarbigg boss marathidhananjay powar
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
archana puran singh income

अर्चना पूरण सिंहच्या कमाईवर पतीचा मोठा खुलासा, म्हणाला, "टीव्ही-फिल्म्सपेक्षा युट्युब व्लॉग्समधून ती…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.