भारतीय संस्कृतीत मंगळसुत्राला सौभाग्याचं लेणं मानलं जातं. प्राचीन काळापासून स्त्रियांच्या या दागिन्याला विशेष महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार मंगळसूत्र घालण्याचा संबंध थेट पतीच्या दीर्घायुष्याशी जोडल्या गेला आहे. असे मानले जाते की, मंगळसूत्र पतीचे आयुष्य वाढवते. त्यामुळे ते धारण केल्याने पती-पत्नीमध्ये प्रेम टिकून राहते. म्हणूनच लग्नात मुलींना मंगळसूत्र घातले जाते. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियासह सर्व माध्यमांमध्ये मंगळसूत्र हा विषय चांगलाच चर्चेत आला होता.
मराठी अभिनेत्री क्षिती जोगने मंगळसूत्रावरुन केलेल्या वक्तव्यामुळे याबबद्दलच्या अनेक चर्चांना उधाण आले होते. यावर अनेकांनी अभिनेत्रीच्या विरुद्ध तसेच काहींनी तिच्याअ समर्थनार्थ आपपली प्रतिक्रिया व्यक्त केली होती. मात्र काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनीही मंगळसूत्र परिधान करत नसल्याचे सांगितले होते. झी मराठीच्या ‘बस बाई बस’ या कार्यक्रमात अमृता फडणवीस यांना मंगळसूत्र घालण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी फारच हटके उत्तर दिले होते.
अमृता फडणवीस यांना या कार्यक्रमात सहभागी झालेल्या एका महिलेने “तुम्ही गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं नाही तर तुम्हाला सासूबाई ओरडत नाही का?” असा प्रश्न विचारला होता. यावर उत्तर देताना त्या म्हणाल्या, “मंगळसूत्र हे सौभाग्याचे प्रतीक असते. त्यामुळे आपल्या पतीने आपला गळा पकडण्यापेक्षा हातात हात धरला पाहिजे. म्हणूनच मी मंगळसूत्र माझ्या गळ्यात न घालता हातात घालायला लागली.”
यावेळी त्यांनी असं म्हटलं होतं की, “लग्न झाल्यानंतर मी खूप प्रयत्न केला की मी मंगळसूत्र घालू आणि ते टिकवू. माझ्या सासूलाही मी मंगळसूत्र घालावे असं वाटत होतं. पण माझी त्वचा खूपच सेन्सेटीव्ह आहे. त्यामुळे मी गळ्यात सतत काही घालून ठेवू शकत नाही”.
आणखी वाचा – “त्या रात्री मी खूप रडलो आणि…” दत्तू मोरेने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाला, “काम मिळत नसल्याचा त्रास…”
यापुढे त्यांनी असं म्हटलं होतं की, “मंगळसूत्र हे आपल्या सौभाग्याचे प्रतीक असते. त्यामुळे मला असं वाटतं की, आपल्या पतीने आपला गळा पकडण्यापेक्षा त्याचा हात आपल्या हातात असावा. त्यामुळे तेव्हापासून मी हातात मंगळसूत्र घालायला लागले आणि तेव्हापासून मला असं वाटतं की देवेंद्रजींनी माझा हात पकडला आहे”.