शुक्रवार, मे 16, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“थाळीतले पाणी पिता, आईस्क्रीमचे झाकण चाटता पण…”, लग्नात अन्नाची नासाडी करणाऱ्यांवर भडकली सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री, म्हणाली, “कुणाच्या तरी बापाने…”

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 15, 2024 | 12:01 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Deepti Devi shared a post on social media and expressed her anger on people who waste food

“थाळीतले पाणी पितात, आईस्क्रीमचे झाकण चाटतात पण...”, अन्नाची नासाडी करणाऱ्यांवर भडकली सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री, म्हणाली, “कुणाच्या तरी बापाने...”

देशात उपाशीपोटी झोपणाऱ्यांची वाढती संख्या आणि अन्नाची प्रचंड नासाडी या समाजातील एकाच नाण्याच्या दोन बाजू कमालीच्या अस्वस्थ करणाऱ्या आहेत. भारतीय संस्कृतीत अन्नाला पूर्णब्रम्ह मानले आहे. अनेक संत-महंतांनी त्यांच्या अभंगांमध्येही त्याचे वर्णन केले आहे. तथापि सार्वजनिक जीवनात नेमके याच्याविरुद्ध प्रदर्शन आढळते. सार्वजनिक कार्यक्रम, समारंभ, लग्नसोहळे किंवा सामूहिक पार्ट्या यात अन्नाची मोठ्या प्रमाणात नासाडी होते. अन्न फेकून देण्याची चढा-ओढ लागते. शिळे अन्न लोक बिनदिक्कतपणे कचराकुंडीत टाकतात.

त्यामुळे पोटाला लागेल तितकेच घ्यावे आणि खावे हा संस्कार लोक विसरले असावेत का? असा प्रश्न पडतो आणि याचबद्दल मराठीतील एका सप्रसिद्ध अभिनेत्रीने आपली नाराजी व खंत व्यक्त केली आहे. ही अभिनेत्री म्हणजे दीप्ती देवी. अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यात एक माणूस फेकून दिलेले किंवा वाया घालवलेले अन्न एकत्र करत आहे. अभिनेत्रीने हाच फोटो शेअर करत असं म्हटलं आहे की, “स्वत:च्या पैशांची पाणीपुरी विकत घेतली तर थाळीतले पाणीही पितात, आईस्क्रीम घेतली तर त्याचे झाकणही चाटतात किंवा शेंगदाणेदेखील घेतले तर त्याचे टर्फल पण सोडत नाही, मग कुणाच्या लग्नसमारंभात अन्न का वाया घालवतात?”

आणखी वाचा – “मी त्यांच्यासारखी नाही”, सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा जया बच्चन यांना टोमणा, म्हणाल्या “मी त्यांच्यापेक्षा खूप…”

यापुढे तिने असं म्हटलं आहे की, “लग्न समारंभातील अन्नासाठी कुणाच्या तरी बापाने आयुष्य कष्ट करुन घालवलेले असते. म्हणून हात जोडून विनंती आहे की, जेवढी भूक असेल आणि पोटात जितकं मावेल तितकंच अन्न घ्या. कृपया अन्न वाया घालवू नका. अन्न हे पूर्ण ब्रम्ह आहे.” या फोटोद्वारे तिने अन्न वाया घालवणाऱ्या व अन्नाची नासाडी करणाऱ्या लोकांना सणसणीत चपराक तर लावलीच आहे. पण याचबरोबर तिने लोकांना अन्न वाया न घालवण्याची विनंतीही केली आहे.

आणखी वाचा – Video : ‘नाम तुझे घेता देवा’, भजनात दंग झाले मुग्धा व प्रथमेश, टाळ-मृदंगाचा जयघोष करत केली गायनसेवा, खास व्हिडीओही केला शेअर

दरम्यान, मराठीबरोबरच हिंदी मालिका व चित्रपटांमधून हटके भूमिका करत दीप्तीने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान मिळवलं आहे. दिप्तीने मोजक्याच पण दमदार भूमिका करत सिनेसृष्टीला आपली दखल घ्यायला भाग पाडलं. नुकत्याच आलेल्या ‘नाळ भाग २’ चित्रपटात अभिनेत्री झळकली होती. ‘मला सासू हवी’ या मालिकेतून् दीप्ती खऱ्या अर्थाने घराघरांत पोहोचली. मग ‘अंतरपाट’,‘परिवार’,‘बडे अच्छे लगते है’ या मालिका तसेच ‘नाळ’, ‘कंडिशन्स अप्लाय’, ‘मंत्र’ ‘चंपक’ या चित्रपटांमध्येही तिने काम केलं आहे.

Tags: deepti devimarathi actressmarathi entertainment news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

aamir khan gf gauri airport video
Entertainment

Video : ६०व्या वर्षी आमिर खान प्रेमात, दोन घटस्फोटानंतर रिलेशनशिप, तिच्या खांद्यावर डोकं ठेवत…

मे 16, 2025 | 6:16 pm
Siddhivinayak temple news
Social

हातावरचं पोट, घर भाडं, कमाईच नाही आणि…; सिद्धीविनायक मंदिरात हार, नारळ बंद करताच विक्रेत्यांचे हाल, गरीब परिस्थितीत…

मे 16, 2025 | 4:50 pm
KRK On Muslims
Entertainment

“भारतातील मुस्लिम खूप आनंदी आणि…”, बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं वक्तव्य, म्हणाला, “रस्त्यावर मरत…”

मे 16, 2025 | 3:44 pm
Monkeys attack viral video
Social

Video : साडीचा पदर खेचला, खाली पाडलं अन्…; महिलेवर माकडांचा विचित्र हल्ला, अशी परिस्थिती केली की…

मे 16, 2025 | 3:18 pm
Next Post
raj anadkat post

Video: “तारक मेहता…”मधील टप्पूने साखरपुड्याच्या अफवांनंतर दिली प्रेमाची कबुली, पोस्टही केली शेअर, नेमकं काय घडलं?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.