शनिवार, मे 17, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video: “तारक मेहता…”मधील टप्पूने साखरपुड्याच्या अफवांनंतर दिली प्रेमाची कबुली, पोस्टही केली शेअर, नेमकं काय घडलं?

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 15, 2024 | 12:18 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
raj anadkat post

Video: “तारक मेहता…”मधील टप्पूने साखरपुड्याच्या अफवांनंतर दिली प्रेमाची कबुली, पोस्टही केली शेअर, नेमकं काय घडलं?

लहान पडद्यावरील ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेतील कलाकार एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. या मालिकेतील ‘बबिता’ ही भूमिका साकारणारी मुनमुन दत्ता व ‘टप्पू’ची भूमिका साकरणाऱ्या राज अनादकट यांच्या साखरपुड्याच्या वृत्ताने संपूर्ण मनोरंजन क्षेत्रांमध्ये एक खळबळ उडाली होती. पण या दोघांनीही या वृत्ताचे खंडन केले असून आपापल्या सोशल मीडियावरुन पोस्ट केल्या आहेत. राज हा मुनमुनपेक्षा जवळपास नी वर्षांनी लहान आहे. (raj anadkat post )

राजने साखरपुडयाच्या बातमीवर आपली प्रतिक्रिया दिली असून त्याने लिहिले आहे की, “तुम्ही ज्या बातम्या कालपासून वाचत आहात त्या सर्व बिनबुडाच्या आहेत. या सर्वच अफवा आहेत- टीम राज अनादकट”. राजच्या टीमकडून ही पोस्ट करण्यात आली असून साखरपुड्याच्या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत. दोन्हीही कलाकारांनी या वृत्ताला नकार दिला आहे. अशातच आता राजचे खरे प्रेम समोर आले असून त्यावर त्याने एक पोस्ट सोशल मिडियावर शेअर केली आहे.

आणखी वाचा – “थाळीतले पाणी पिता, आईस्क्रीमचे झाकण चाटता पण…”, लग्नात अन्नाची नासाडी करणाऱ्यांवर भडकली सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री, म्हणाली, “कुणाच्या तरी बापाने…”

View this post on Instagram

A post shared by Raj Anadkat (@raj_anadkat)

साखरपुड्याच्या वृत्ताला पूर्णविराम दिल्यानंतर राजने आता एक व्हिडीओ शेअर केला असून क्रिकेटबद्दल आपलं प्रेम व्यक्त केले आहे.राज जेव्हा मॅच पाहण्यासाठी स्टेडियममध्ये गेला तेव्हा त्याच्या हातात क्रिकेटची बॅट होती. हा व्हिडीओ शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “ही मॅच किती रंजक होती. चेन्नई सिंगम्सने आयएसपीएल मध्ये खूप चांगले प्रदर्शन केले असून ही जिंकले आहे. मी या मॅचचा खूप आनंद घेतला. Ibis India”. राजने या मॅचचा पूर्णपणे आनंद लुटला असून तो सध्या आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहे.

आणखी वाचा -“आई कुठे…”, मालिकेमधून आशुतोष केळकरची एक्झिट दाखवताच मिलिंद गवळींची पोस्ट चर्चेत, म्हणाले, “तो नसणार याचा मला…”

साखरपुड्याच्या वृत्तावर राजबरोबरच मुनमुनने देखील सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आहे. तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “मी माझे सर्वोत्तम आयुष्य जगत आहे. माझ्या न्यूयॉर्क प्रवासातील हे खास फोटोशूट शेअर करत आहे”, याचबरोबर साखरपुड्याच्या वृत्तावर तिने एका माध्यमालाही मुलाखत दिली असून त्यामध्ये ती म्हणाली की, “या बातम्या केवळ अफवा आहेत. या बातम्यांमध्ये अजिबात तथ्य नाही आणि मला अशा अफवांवर माझी ऊर्जा वाया घालवायची नाही”. मुनमुन सध्या न्यूयॉर्कमध्ये आहे.

Tags: actorEngagementMunmun duttaraj anadkattelevision actorTv actor
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Water Disadvantages
Lifestyle

तुम्हीही जास्त पाणी पीत आहात का?, फायद्यापेक्षा तोटेच अधिक, नक्की काय होतं?

मे 16, 2025 | 7:00 pm
aamir khan gf gauri airport video
Entertainment

Video : ६०व्या वर्षी आमिर खान प्रेमात, दोन घटस्फोटानंतर रिलेशनशिप, तिच्या खांद्यावर डोकं ठेवत…

मे 16, 2025 | 6:16 pm
Siddhivinayak temple news
Social

हातावरचं पोट, घर भाडं, कमाईच नाही आणि…; सिद्धीविनायक मंदिरात हार, नारळ बंद करताच विक्रेत्यांचे हाल, गरीब परिस्थितीत…

मे 16, 2025 | 4:50 pm
KRK On Muslims
Entertainment

“भारतातील मुस्लिम खूप आनंदी आणि…”, बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं वक्तव्य, म्हणाला, “रस्त्यावर मरत…”

मे 16, 2025 | 3:44 pm
Next Post
Alia Bhatt Birthday Party

Video : आलिया भट्टच्या बर्थडे पार्टीमध्ये तिच्या सासूबाईंचीच हवा, अंबानी कुटुंबियांचीही उपस्थिती, मात्र लेक राहाला सोडून सेलिब्रेशन अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.