दीपिका पदुकोण व रणवीर सिंह यांनी लवकरच ते पालक होणार असल्याची आनंदाची बातमी शेअर केली आहे. दीपिका गरोदर असल्याची बातमी दोघांनीही त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली. यादरम्यान त्यांनी या वर्षी सप्टेंबरमध्ये त्यांच्या बाळाला जन्म देणार असल्याचे घोषित केले. म्हणजे दीपिकाची डिलिव्हरीची तारीख सप्टेंबर असल्याचं त्यांनी पोस्टमधून सांगितलं आहे. दीपिकाशिवाय यामी गौतमही बी-टाऊनमध्ये आई होणार आहे. (Deepika Padukone Pregnancy)
दीपिका सध्या ३८ वर्षांची आहे आणि साधारणपणे या वयात महिलांना गर्भधारणा करण्यात अडचणी येतात. या वयात किंवा याहून मोठ्या वयात गर्भधारणा करत असाल तर जाणून घ्या, यावेळी तुम्हाला कोणत्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. मायोक्लिनिकच्या मते, या वयात तुम्ही आई बनल्यास, जुळी मुले होण्याची शक्यता अधिक असते. कारण या वयात हार्मोनल बदल अपेक्षित असतात. त्याच वेळी, IVF केल्यानंतरही जुळी मुले होण्याची शक्यता जास्त असते.
गरोदर असताना, तुम्ही नियमित तपासणीसाठी डॉक्टरांकडे जावे. डॉक्टर तुमच्या व तुमच्या बाळाच्या आरोग्यावर लक्ष ठेवतील आणि काही चिंता असल्यास ते तुमच्याशी त्याबद्दल बोलतील तुम्हाला कोणतीही चिंताजनक लक्षणे आढळल्यास, त्यांच्याबद्दल तुमच्या डॉक्टरांना सांगा. गरोदरपणात फॉलीक ऍसिड, कॅल्शियम, लोह, व्हिटॅमिन डी व इतर पोषक घटके शक्य तितके घ्यावे. जर तुम्ही निरोगी आहार घेत असाल तर ते खूप चांगले आहे. कोणत्याही पोषक तत्वांची कमतरता भरुन काढण्यासाठी तुम्ही जन्मपूर्व जीवनसत्त्वे घेऊ शकता.
तसेच दररोज शारीरिक व्यायाम करणं आवश्यक आहे. यामुळे उर्जा वाढून आरोग्य सुधारण्यास मदत होईल. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणताही व्यायाम करु नये आणि व्यायाम करताना अस्वस्थ वाटत असेल तर तात्काळ डॉक्टरांना कळवावे. गर्भवती महिलेने कोणत्याही परिस्थितीत दारू, तंबाखू व बेकायदेशीर औषधे घेऊ नयेत. याशिवाय डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध किंवा सप्लिमेंट घेऊ नये. गरोदरपणात वजनावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
(टिप – वरील दिलेले उपाय करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या ओळखीच्या डॉक्टरांचा अवश्य सल्ला घ्या.)