भारतातील करोडपती मुकेश अंबानी यांच्या घरी सध्या लग्नाची लगबग सुरू आहे. जामनगर येथे आजपासून लग्नाआधीच्या कार्यक्रमांना सुरवात झाली आहे. या कार्यक्रमासाठी जगभरातील विविध क्षेत्रातील अनेक दिग्गजांची उपस्थिती असणार आहे. राधिका मर्चंट व अनंत अंबानी दोघेही १२ जुलै रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत. वधू-वरांना आशिर्वाद देण्यासाठी बॉलिवूड, हॉलिवूड व इतर क्षेत्रातील मान्यवार हजर राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी ‘ग्रॅमी पुरस्कार’ विजेती हॉलिवूड गायिका रिहाना जामनगर येथे रिहाना गुरुवारी तिचा पार्टनर रॉकीसह दाखल झाली. या तीन दिवस चालणाऱ्या कार्यक्रमासाठी विविध थीमचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमामध्ये रिहाना तिच्या काही गाण्यांचे सादरीकरण करणार आहे. (Ambani family pre-wedding functions)
नुकतेच सोशल मीडियावर रिहानाच्या रीहर्सलचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. आपल्या शोमध्ये लागणाऱ्या सर्व सामानासह रिहाना भारतात दाखल झाली होती. पण या सादरीकरणासाठी मुकेश अंबानी यांनी किती पैसे मोजले आहेत हे माहीत आहे का? आपल्या लाडक्या लहान मुलाच्या लग्नासाठी अंबानी कोणतीही कसर सोडत नाही आहेत. रिहानाच्या लाईव्ह परफॉर्मन्ससाठी तब्बल ५ मिलियन डॉलर्स म्हणजे ४१ कोटी ४२ लाख ६५ हजार रुपये मोजले आहेत. ही रक्कम रिहानाला तीन दिवस परफॉर्म करण्यासाठी मिळाली असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
अनंत व राधिकाच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमासाठी गुजरात येथील जामनगरची निवड करण्यात आली. या ठिकाणी अंबानी कुटुंबाने १४ मंदिरेही बांधली आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमामध्ये बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान, रणवीर सिंह, आलिया भट्ट, रणबीर कपूर, जान्हवी कपूर, करण जोहर हे उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमांना आज सुरवात झाली असून आजची थीम ‘अॅन इव्हिनिंग इन एव्हरलँड’ अशी आहे. यामध्ये ‘एलिगंट कॉकटेल’ हा ड्रेसकोड असून यादिवशी संगीत, नृत्य व इतर काही विशेष परफॉर्मन्सचा समावेश असणार आहे. रिहानादेखील आज परफॉर्म करणार आहे.