Deepika Padukone Feeling Stressed : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या खूप चर्चेत आहे. ८ सप्टेंबर २०२४ साली तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. याबद्दलची माहिती तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली होती. आतापर्यंत दोघांनीही आपल्या मुलीची झलक दाखवली नसून तिचे नावही उघड केले नाही. अशातच अभिनेत्रीने गरोदरपणात आणि गरोदरपणानंतर बाळाच्या संगोपनानंतर झोप न मिळाल्याने काय होते, हे अभिनेत्रीने सांगितले आहे. दीपिका पदुकोणने जागतिक मानसिक आरोग्य दिन २०२४ निमित्त ‘लिव्ह लव्ह लाफ’ फाऊंडेशनच्या व्याख्यानमालेत केलेलं भाष्य सध्या चर्चेत आलं आहे.
अभिनेत्रीने यावेळी असे सांगितले की, “जेव्हा तुम्हाला पुरेशी झोप येत नाही किंवा थकवा येतो तेव्हा तुम्ही निर्णय घेता. तेव्हा मला असे वाटते की, कधीकधी मी खरोखरच ते अनुभवू शकते”. ती पुढे म्हणते, “मला माहित आहे की, काही दिवसांत मला पुरेशी झोप न मिळाल्याने किंवा स्वत:ची काळजी न घेतल्याने मला तणाव किंवा थकवा जाणवला. मी सांगू शकते की, माझा निर्णय घेण्याच्या क्षमतेवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला होता”.
दोघांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, दीपिका व रणवीर रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’ या चित्रपटात दिसणार आहेत. हा चित्रपट १ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, अजय देवगण, करीना, जॅकी श्रॉफ, टायगर श्रॉफ, अर्जुन कपूर आणि रणवीर सिंग, दीपिका पदुकोण यांच्या भूमिका आहेत. याआधीही रणवीर-दीपिकाने एकत्र स्क्रीन शेअर केली आहे. दोघांनी ‘रामलीला’, ‘पद्मावत’, ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘८३’ सारखे चित्रपट केले आहेत.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi मध्ये जाण्यासाठी बायकोचा अभिजीत सावंतला होता नकार, स्वतःच म्हणाली, “तिथे फक्त भांडणं…”
‘सिंघम अगेन’चा ट्रेलर ७ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रदर्शित झाला होता, पण दीपिका तिच्या मुलीमुळे कार्यक्रमाला उपस्थित राहू शकली नाही. रणवीरने स्वतः सांगितले की ती तिच्या मुलीची काळजी घेत आहे आणि तिची ड्युटी रात्रीची आहे. यावरुन रणवीर व दीपिका तिच्या लेकीची किती काळजी घेतात, तिला विशेष वेळ देतात हे समोर आलं आहे.