सध्या जास्त महत्व आहे ट्रेंडिंग गोष्टींना आणि फक्त काही घटनांचा नाहीतर काही व्यक्तिमत्व सुद्धा चांगलीच चर्चेत आहेत. मग ती खेळ क्षेत्रातून महेंद्र सिंग धोनी असो किंवा राजकारणातून शरद पवार. अशाच एक ट्रेंडिंग मध्ये असलेलं व्यक्तिमत्तव म्हणजे नृत्यांगना गौतमी पाटील.(Gautami Patil Wedding)
गौतमी पाटील ने नाव मागच्या काही काळापासून चांगलंच चर्चेत आहे. आक्षेपार्य नृत्य प्रकारानंतर क्षमा मागून गौतमीने पुन्हा आपल्या नृत्याची जादू सर्वदूर पसरवली. गौतमी बाबत अनेक चर्चा रंगताना दिसतात. कधी तिच्या राजकारणातील प्रवेशावरून तर कधी तिच्या आडनावावरून. सगळीकडे फक्त एकच नाव पाहायला मिळतंय ते म्हणजे गौतमी पाटील.
गौतमी पुन्हा एका विषयासाठी चर्चेत आली आहे. बीडच्या एका व्यक्तीने तिला पत्र लिहीत लग्नाची मागणी घातली आहे. बीडच्या एका २६ वर्षीय तरुणाने थेट गौतमीला पत्र लिहिले आहे. रोहन गलांडे पाटील या तरुणाने पत्र मध्ये लिहिले आहे. गौतमी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील तू माझी परी होतेस का? असा मजकूर लिहिला आहे. एवढ्यावरच न थांबता या तरुणाने पुढे आपल्या घरचा पत्ता देखील लिहिला आहे आणि म्हणलं आहे ” लग्नाला तयार असशील तर कळव आपण भेटू”.
![(Gautami Patil Wedding)](https://marathi.itsmajja.com/wp-content/uploads/2023/05/gautami-patil-wedding-itsmajja-1024x546.jpg)
रोहन ने या पत्रात गौतमीला तिच्या एका मुलाखतीची आठवण करून देत लिहिले आहे तू एकदा मुलाखतीत म्हणाली होतीस तुला श्रीमंत मुलगा नको आहे. तुझ्या संसाराचा भर उचलेल असा मुलगा हवा आहे. तर मला तुझ्या सगळ्या अटी मान्य आहेत. मी एक शेतकरी मुलगा आहे. जर तुझ्या सोबत लग्न करण्यास कोण तयार नसेल तर माणुसकीच्या नात्याने मी कोणत्याही परिस्थतीत तुझ्याशी लग्न करायला तयार आहे.(Gautami Patil Wedding)
हे देखील वाचा – आणि खांद्यावरच्या माकडाने अशोक सराफ यांना सणसणीत टपली मारली
अनेक चाहत्यांना आपल्या अदांनी भुरळ पडणारी गौतमी बीडच्या या चाहत्याच्या पत्राची दखल घेणार का? हे पाहणं आता रंजक ठरणार आहे