Daljiet Kaur News : टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री दलजित कौरचे ही तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे गेले काही दिवस चर्चेत आहे. लग्नाच्या अवघ्या आठ महिन्यांनंतरच अभिनेत्री पतीपासून विभक्त झाली आहे. २०२३ मध्ये दलजित कौरने केनियातील व्यावसायिक निखिल पटेलबरोबर लग्न केले. पण लग्नाच्या काही महिन्यांनंतर त्यांच्या नात्यात अडचणी येऊ लागल्या. दलजित कौरने पती निखिल पटेलवर आपली फसवणूक आणि विवाहबाह्य संबंध ठेवल्याचा आरोप केला होता. यावरुन दोघांमध्ये वादही सुरु असलेले पाहायला मिळाले. अशातच तो मुंबईत आला असून त्याच्या मैत्रीणीबरोबर दिसला होता. यानंतर दलजित कौरने पती निखिल पटेल याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. (Daljiet Kaur filed a complaint against husband)
‘टाइम्स नाऊ’च्या वृत्तानुसार, अभिनेत्रीने २ ऑगस्ट रोजी मुंबईतील आग्रीपाडा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. भारतीय दंड विभागच्या अंतर्गत कलम ८५ आणि ३१६(२) अंतर्गत तक्रार नोंदवण्यात आली आहे. याचा अर्थ दलजितने निखिलवर क्रूरता आणि विश्वासघाताचा आरोप केला आहे. दलजितने एक पोस्टही शेअर केली आहे यात तिने असं म्हटलं आहे की, “पोलिस सहआयुक्त अनिल पारसकर, डीसीपी कृष्णकांत उपाध्याय, वरिष्ठ निरीक्षक योगेंद्र पाचे आणि तपास अधिकारी सचिन शेळके यांच्यासह एका महिला कॉन्स्टेबलचे तुमच्या तत्पर प्रतिसादासाठी आणि कार्यक्षमतेबद्दल आभार. पोलीस स्टेशनमध्ये प्रवेश करताना मी खूप घाबरली होते. पण माझ्या दुर्दशेबद्दल तुमचा दयाळूपणा आणि संवेदनशील दृष्टीकोन खरोखरच खूप हृदयस्पर्शी होता. एका महिलेला ती या देशात सुरक्षित असल्याचा विश्वास दिल्याल्याबद्दल आग्रीपाडा पोलिस स्टेशनचे आभार”.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi 5 : अखेर ‘बिग बॉस’ने निक्कीचा माज उतरलावच, सर्वांसमोर वर्षाताईंची मागितली माफी, म्हणाली…
केनियामध्ये राहणारा निखिल पटेल सध्या भारतात आहे. शुक्रवार, २ ऑगस्ट रोजी ते मुंबईत पोहोचले. जेव्हा तो त्याच्या कथित मैत्रिणीबरोबर विमानतळावर दिसला. दलजित कौर यांनी पतीवर कायदेशीर कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ नाही. या वर्षी जूनमध्ये, अभिनेत्रीने निखिलच्या विरोधात नैरोबी सिटी कोर्टात धाव घेतली आणि निखिल पटेलला तिला किंवा तिच्या मुलाला केनियातील त्यांच्या घरातून बाहेर काढण्यापासून रोखण्यासाठी स्थगिती आदेश मिळवला होता.
दरम्यान, निखिल पटेल हा पेशाने व्यावसायिक असून केनिया येथे राहतो. लग्नानंतर दलजित ही मुलगा जेडेनबरोबर केनियाला शिफ्ट झाला. गेल्यावर्षी दलजितने आपला मुलगा, दुसरा पती आणि त्याच्या दोन मुलींबरोबर नवीन आयुष्य सुरु केले. मार्च २०२३ मध्ये लग्न झाल्यानंतर १० महिन्यांनी म्हणजेच जानेवारी २०२४ मध्ये ती भारतात परतली. त्याचवेळी दलजित व निखिलच्या संसारात अडचणी निर्माण झाल्याची चर्चा सुरु झाली होती.